Headlines

Nanded devotees visiting mahadev temple on shravan face horrific accident four dead; श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; चार जणांचा मृत्यू, सहा गंभीर


​अर्जुन राठोड, नांदेड: श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शनासाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील भाविकांवर काळाने घाला घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील कैलास टेकडी आणि सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परतताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव महिंद्रा कमांडर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह चार भाविकांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. किनवट तालुक्यातील दिपला नाईक तांड्याजवळ सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेने तेलंगणा राज्यातील पारडी गावात शोककळा पासरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील पारडी (बी) येथील भाविक श्रावणी सोमवारनिमित्त ३१ ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील कैलास टेकडी येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे सर्वजण कैलास टेकडीवरून सहस्त्रकुंड येथे दर्शनासाठी रवाना झाले. सहस्त्रकुंड येथे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक महिंद्रा कमांडर वाहनाने (क्र. AP 25 AH 6747) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पारडी (बी) या आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. ​

दरम्यान, दिपला नाईक तांड्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकले. ही धडक एवढी भीषण होती की, वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात तुम सायलू (वय ७०), तुम गौराबाई (वय ६०) आणि आऊला गंगन्ना (वय ७५, सर्व रा. पारडी-बी, तेलंगणा) यांचा जागीच मृत्यू झाला. ​वाहनातील चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. अपघातातील अन्य सहा जण गंभीर जखमी असून, त्यांना खासगी वाहनांच्या मदतीने पुढील उपचारासाठी तेलंगणातील म्हैसा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​घटनास्थळाचे दृश्य अत्यंत भीषण होते. अपघाताची माहिती मिळताच भाविकांचे नातेवाईक, तेलंगणा पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत