Nagpur Young Cricketer Aaditi Chaukhande Death after missing Selection in Vidarbha Team Crime News; क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला
Nagpur Young Cricketer Aaditi Chaukhande Death after missing Selection in Vidarbha Team Crime News; क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला
Nagpur Young Lady Cricketer Death : आदिती भावासह नागपूर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होती, आणि तिलाही विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने ती तणावात होती
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवल्याची घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथे उघडकीस आली. आदिती (वय १७, मूळ रा. अकोला) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने आदिती तणावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बुधवारी प्रबल क्रिकेट स्पर्धेसाठी बाहेरगावी गेला होता. रात्री आदितीने आईसोबत जेवण केले. त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. यादरम्यान तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटे हा प्रकार समोर आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा?
कर्जाच्या तणावातून दोन भावंडांनी जीव दिला
दुसरीकडे, कर्जबाजारीपणाच्या तणावातून दोन भावंडांनी जीव दिल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मालेगाव येथे गुरुवारी सकाळी घडली. निरंजन लक्ष्मण फिरके वय ४० आणि योगेश लक्ष्मण फिरके वय ३७, दोघेही रा. मालेगाव, सावनेर, अशी मृतांची नावे आहेत. Crime News : पती ऑस्ट्रेलियात, बोलायलाही वेळ नसतो; सुनेने दोन वर्ष कुटुंबाला गंडवलं, शेवटी ‘दृश्यम’ स्टाईल उलगडा, 12 फूट खोदकाम मोठा भाऊ धनंजयसह ते एकत्र राहत होते. फिरके कुटुंबीयांची मुख्य बाजारात ‘गहना दूध डेअरी’ आहे. दुधाच्या व्यवसायासोबतच त्यांचा बेकरीचाही व्यवसाय आहे. फिरके कुटुंबीयांनी बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्यांनी बँकेचे हप्ते नियमित भरले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ते थकले होते. त्यामुळे बँकेने घराच्या जप्तीची नोटीस पाठवली होती. तिघेही तणावात होते. मंगळवारी रात्री धनंजय हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दोघांनी रुळाजवळ जाऊन जीवनयात्रा संपवली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा