Headlines

Nagpur Young Cricketer Aaditi Chaukhande Death after missing Selection in Vidarbha Team Crime News; क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला


Nagpur Young Lady Cricketer Death : आदिती भावासह नागपूर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होती, आणि तिलाही विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा होती. मात्र ​गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने ती तणावात होती

Nagpur lady Cricketer Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भ क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवल्याची घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथे उघडकीस आली. आदिती (वय १७, मूळ रा. अकोला) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आदिती नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील अकोला येथे बांधकाम कंत्राटदार आहेत. आई आणि भावासह ती नागपुरात राहत होती. तिचा भाऊ प्रबल हा २३ वर्षांखालील वयोगटात विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळतो. आदितीही भावासह नागपूर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होती. तिलाही विदर्भ संघाकडून खेळण्याची इच्छा होती.
Maharashtra TimesNashik Crime : दुसऱ्या पत्नीसह सुखी संसार, अचानक लेकीच्या विरहाचं दुःख, तिसऱ्या दिवशी पित्याने घेतला जगाचा निरोप

दोन वर्षांपासून निवड होईना

गेल्या दोन वर्षांपासून संघात निवड होत नसल्याने आदिती तणावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बुधवारी प्रबल क्रिकेट स्पर्धेसाठी बाहेरगावी गेला होता. रात्री आदितीने आईसोबत जेवण केले. त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. यादरम्यान तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटे हा प्रकार समोर आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा?

कर्जाच्या तणावातून दोन भावंडांनी जीव दिला

दुसरीकडे, कर्जबाजारीपणाच्या तणावातून दोन भावंडांनी जीव दिल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मालेगाव येथे गुरुवारी सकाळी घडली. निरंजन लक्ष्मण फिरके वय ४० आणि योगेश लक्ष्मण फिरके वय ३७, दोघेही रा. मालेगाव, सावनेर, अशी मृतांची नावे आहेत.
Maharashtra TimesCrime News : पती ऑस्ट्रेलियात, बोलायलाही वेळ नसतो; सुनेने दोन वर्ष कुटुंबाला गंडवलं, शेवटी ‘दृश्यम’ स्टाईल उलगडा, 12 फूट खोदकाम
मोठा भाऊ धनंजयसह ते एकत्र राहत होते. फिरके कुटुंबीयांची मुख्य बाजारात ‘गहना दूध डेअरी’ आहे. दुधाच्या व्यवसायासोबतच त्यांचा बेकरीचाही व्यवसाय आहे. फिरके कुटुंबीयांनी बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्यांनी बँकेचे हप्ते नियमित भरले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ते थकले होते. त्यामुळे बँकेने घराच्या जप्तीची नोटीस पाठवली होती. तिघेही तणावात होते. मंगळवारी रात्री धनंजय हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दोघांनी रुळाजवळ जाऊन जीवनयात्रा संपवली.