Headlines

Vidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी – vidarbha heavy rain 24 major roads in gadchiroli district closed 700 peoples in bhamragad moved to safety


Vidarbha Rain Update: ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ची पथके संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

विदर्भ
विदर्भ पाऊस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
नागपूर: विदर्भात मागील २४ तासांत बरसलेल्या दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक या पुरामुळे थांबली होती. सुमारे दोनशेहून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता . मेळघाटातील सिपना नदीला पूर आल्याने वीस गावांचा संपर्क तुटला होता. या पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढल्याने वैनगंगा नदीवरील गोसे खुर्द धरणाचे २९ आणि पूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्याची संपर्क यंत्रणा विस्कळित झाली आहे. सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला असून, पूराचा धोका लक्षात घेऊन सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे . गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले.
Maharashtra TimesRain News: मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा
पुरामुळे आलापल्लीहून दुरुस्तीसाठी निघालेल्या ‘महावितरण’च्या पथकाला मार्गात अडथळे आल्याने बिघाड दूर करता आला नाही. त्यामुळे २४ तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकलेला नसून, नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही अंधारात रात्र काढावी लागत आहे.

मेळघाटात परिस्थिती गंभीर
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले असून, मेळघाटातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर बनली आहे . सिपना नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे धारणी तालुक्यातील सुमारे २० गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. शहरातील इर्विन चौकात मोठे झाड कोसळून एक जण गंभीर जखमी झाला
Maharashtra TimesNagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
यवतमाळ, चंद्रपूरला फटका
– गुरुवारी वणी तालुक्यातील शिंदोळा, कायर, रासा, झरी जामणी तालुक्यातील झरी, खडकडो, मुकुटबन येथे अतिवृष्टी
– उमरखेड तालुक्यातील उमरखेड-किनवट रस्ता पावसामुळे खचल्याने वाहतूक बंद
– राळेगाव तालुक्यातील वडकी गावाजवळील पिंपळापूर मार्गावरील नाल्याला पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
– केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण १०० टक्के भरल्याने खुनी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा