Nagpur Crime News : पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता.

‘माझ्या भावाला का मारले’
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पवन व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून काका आणि पवन टोळी एकमेकांचा काटा काढण्याच्या तयारीत होती. काकाने वेदांत व साथीदारांच्या मदतीने पवनच्या हत्येचा कट आखला. वाद मिटविण्याच्या बहाण्याने पवनला मानेवाडा घाटावर बोलाविण्यात आले. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पवन, अमन काळे, अजय काळे आणि अजय सोलंकी हे चौघे घाटावर आले. तेथे काका, अजय व त्यांच्या साथीदारांनी चौघांना घेरले. ‘माझ्या भावाला का मारले’, अशी विचारणा अजयने पवनला केली. त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला.
Satara Crime : साताऱ्यात सिनेस्टाईल थारची चोरी, पोलिसांनी शहर पिंजून काढलं, अखेर आरोपीची एक चूक अन् नांग्या ठेचल्या
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल
वाद विकोपाला जाताच अजयच्या साथीदाराने पवनच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर इतरांनी चौघांवर शस्त्रांनी हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी चौघेही पळू लागले. मात्र, काका व त्याच्या साथीदारांनी पवनला गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. यात पवनचा मृत्यू झाला. अमन काळेही आरोपींच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला. अजय काळे आणि अजय सोलंकी मात्र आरोपींच्या तावडीतून बचावले. पवनचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच काका आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला. जखमी अमन काळे याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
Accident News: सख्या भावांच्या बाईकला बारामतीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; काळाजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेऱ्यात कैद!
आधी मैत्री, नंतर घात
काकाने वेदांतच्या मदतीने पवनच्या हत्येचा कट आखला होता. मात्र, पवन सहज तावडीत सापडत नव्हता. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी वेदांतने पवनला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पवनने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. शनिवारी वेदांतने काकासोबतचा वाद मिटवून देतो, असे सांगून पवनला मानेवाडा घाटावर बोलावले. मित्र असल्याने तो घात करेल, असा संशय पवनला आला नाही. मात्र, तेथे पोहोचताच काका आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रांनी वार करून पवनची हत्या केली.

