Headlines

Nagpur Husband Shares Wife Objectionable Photos clicked on Lodge with Girlfriend Crime News; लॉजमध्ये बायकोचे आक्षेपार्ह फोटो काढले, मैत्रिणीला पाठवून व्हायरल, पतीसह दोघांवर गुन्हा


Nagpur Woman Photos on Lodge : मी खोली भाड्याने घेतली आहे, आपण बोलून वाद मिटवूया, असे सांगून पतीने पत्नीला लॉजवर बोलवले होते. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो काढले

Nagpur Lodge Crime Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लॉजमध्ये नेऊन पत्नीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढून ते मैत्रिणीच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या पतीसह दोघांविरूद्ध अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश व कुंदा दोन्ही रा. मौदा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३० वर्षीय सुष्मिता (नाव बदललेले) हिच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मी खोली भाड्याने घेतली आहे, आपण बोलून वाद मिटवूया, असे सांगून पतीने पत्नीला लॉजवर बोलावले होते. त्यानंतर हा प्रकार घडला.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मंदिरात लग्न

सुष्मिता शेतात काम करते. २०१५ मध्ये तिचे कुही तालुक्यातील युवकासोबत लग्न झाले. युवकाला दारूचे व्यसन असल्याने तो सतत पत्नीला मारहाण करायचा. दोघांनी फेब्रुवारी महिन्यात घटस्फोट घेतला. दरम्यान सुष्मिताची महेश याच्यासोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. दोघांनी भंडाऱ्यातील एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर महेश हा दारू पिऊन सुष्मिताला मारहाण करायला लागला. त्यामुळे सुष्मिता माहेरी आली. चार दिवसांनी तिने महेशच्या मोबाइलवर संपर्क साधला. परत घेऊन जा, असे ती म्हणाली. परंतु महेशने तिला परत आणले नाही.

लॉजवर बोलावून आक्षेपार्ह फोटोशूट

१२ जूनला महेशने सुष्मिताच्या मोबाइल संपर्क साधला. मी खातमध्ये खोली भाड्याने घेत आहे. आपण बोलून वाद मिटवू, असे तो तिला म्हणाला. तिला खात येथे बोलाविले. सुष्मिता खात येथे आली. त्यानंतर महेश तिला बाबा लॉजमध्ये घेऊन गेला. येथे मोबाइलद्वारे त्याने सुष्मिताचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. काही दिवसांनी तुला घेऊन जातो, असे म्हणत महेशने तिला परत माहेरी पाठविले.
Maharashtra TimesSiya Goyal : सिया-चेतनचा चार महिन्यापूर्वी गुपचूप विवाह? केतन अग्रवाल केसमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट, व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर
२१ जूनला कुंदाने सुष्मिताच्या व्हॉट्सॲपवर लॉजमधील आक्षेपार्ह छायाचित्र पाठविले. सुष्मिताने तिला विचारणा केली. महेशनेच मला छायाचित्र पाठविल्याचे तिने सांगितले. कुंदाने हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी सुष्मिताला दिली. त्यानंतर सुष्मिताने अरोली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये महेश व कुंदाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेत ₹1500 ऐवजी ₹2100? PM- EACची शिफारस

फेसबुक फ्रेंडचा नर्सवर अत्याचार

दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून फेसबुकवरील फ्रेंडने २४ वर्षीय परिचारिकेवर अत्याचार केल्याची घटना नागपूर येथील कळमना भागात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. अमर धकाते (रा. लकडगंज) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
Maharashtra TimesMuskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
तक्रारदार तरुणी एका क्लिनिकमध्ये परिचारिका आहे. २०१९ मध्ये अमरची फेसबुकवरून तिच्याशी ओळख झाली होती. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, अमरचे अन्य एका तरुणीसोबत साक्षगंध झाले. याबाबत तरुणीला कळाले. तिने अमर याला लग्नाबाबत विचारण केली. मात्र अमरने नकार दिला. तरुणीने कळमना पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अमरला अटक केली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा