two additional weekly special trains between Nanded and Mumbai Time Table Details; मुंबई-नांदेड मार्गावर आणखी दोन विशेष ट्रेन; कधी धावणार, कुठे थांबणार?
two additional weekly special trains between Nanded and Mumbai Time Table Details; मुंबई-नांदेड मार्गावर आणखी दोन विशेष ट्रेन; कधी धावणार, कुठे थांबणार?
Nanded To Mumbai Train Update : मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता रेल्वेने आनंददायी बातमी दिली आहे. कारण आता या मार्गावर जास्तीच्या ट्रेन्स दिल्या जाणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने मुंबई-नांदेड मार्गावर आणखी दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील पहिली विशेष गाडी (क्र. १७६६७) हजूर साहिब नांदेड येथून प्रत्येक बुधवारी रात्री ९.१५ वाजता सुटणार असून पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा आजरोजी (८ जुलैपासून) सुरू झाली आहे.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १७६६८ प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. मनमाड, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत आणि पूर्णा मार्गे ही गाडी शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीची सेवा ९ जुलैपासून सुरू होणार आहे.
याशिवाय आणखी एक साप्ताहिक रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १७६६५ ही प्रत्येक सोमवारी रात्री ९.१५ वाजता नांदेडहून सुटून मंगळवारी दुपारी १.४० वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा १३ जुलैपासून सुरू होईल.
तर परतीच्या दिशेने गाडी क्रमांक १७६६६ प्रत्येक मंगळवारी सायंकाळी ४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. ही गाडी बुधवारी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. या सेवेची सुरुवात १४ जुलैपासून होणार आहे.
गाड्या कुठे थांबणार?
या चारही विशेष गाड्यांना पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही या गाड्यांचा फायदा होणार आहे.
प्रशासनाचं आवाहन
दरम्यान, या विशेष गाड्यांसाठीचं आरक्षण पीआरएस आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या ऑनलाइन पोर्टलवर सुरू झालं आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या अतिरिक्त रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा