Headlines

आज नवा फोन लॉन्च होणार, कॅमेरा, बॅटरीसह फीचर्सही खास, उत्सुकता वाढली। Maharashtra Times


मोटोरोला कंपनी आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G77 Power’ सादर करणार आहे. अधिकृत लाँचपूर्वीच या फोनच्या मायक्रोसाइटवरून त्याचे मुख्य फीचर्स समोर आले आहेत. ग्राहकांना यामध्ये उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे या फोनबाबत उत्सुकता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Moto G77 Power। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
भारतीय ग्राहकांसाठी आज मोटोरोलाचा नवा Moto G77 Power स्मार्टफोन लाँच होत आहे. या फोनच्या फीचर्सची माहिती देणारी मायक्रोसाइट लाईव्ह झाली असून, त्याद्वारे फोनची बॅटरी क्षमता, डिस्प्ले क्वॉलिटी, कॅमेरा सेटअप आणि OS डिटेल्स कन्फर्म झाले आहेत. आज होणाऱ्या या लाँचिंगकडे टेक विश्वाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

मोटोरोलाचा नवीन Moto G77 Power स्मार्टफोन आज भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच होणार आहे. या नव्या आगामी फोनसाठी फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइट देखील तयार आहे, ज्यामुळे फोनचा कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि ओएस तपशील लाँच होण्यापूर्वीच समोर आले आहेत. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 16 वर काम करेल, लाँचिंगपूर्वी या फोनमध्ये Android 17 अपग्रेड मिळेल याची देखील पुष्टी झाली आहे.

Moto G77 Power स्पेसिफिकेशन कोणते?

मायक्रोसाइटच्या मते, मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी LYTIA 600 कॅमेरा सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल. या फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा फोन 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह लाँच केला जाईल. गोरिल्ला ग्लास 7i चा वापर स्क्रीन प्रोटेक्शनसाठी केला जाईल.

हा फोन 7000 एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह येईल आणि कंपनीचा दावा आहे की बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर तीन दिवस टिकेल. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात येणार असून या फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस, स्टिरिओ स्पीकर्स, हाय रेस ऑडिओ सपोर्ट देखील आहे.

Moto G77 Power किंमत भारतात किती?

एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, मोटोरोलाचा हा फोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. या प्राइस रेंजमध्ये हा फोन विवो, आयकुओ, सॅमसंग, विवो आणि ओप्पो सारख्या ब्रँड्सना कडवी टक्कर देणार आहे.

संभाव्य फीचर्स कोणते आहेत?

मोटोरोलाचा हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 6400 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, वॉटर टच टेक्नॉलॉजी, 1050 निट्स हाय ब्राइटनेस मोडसह येऊ शकतो. याशिवाय हा फोन 8 बिट कलर पॅनल आणि डिस्प्ले कलर बूस्ट सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 1 ओएस आणि 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळू शकतात.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा