Murder case of a friend by another in alcoholic rage shocking incident after insulting wife; दारूच्या नशेत राजू पत्नीला नको नको ते बोलला, नंतर ३ मित्रांनी बदला घेतला
Murder case of a friend by another in alcoholic rage shocking incident after insulting wife; दारूच्या नशेत राजू पत्नीला नको नको ते बोलला, नंतर ३ मित्रांनी बदला घेतला
Friend Murder Case: पोलिसांनी पांडुरंग गायकवाड, युवराज गायकवाड आणि सोनू गव्हाणे या तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली आहे.
दारूच्या नशेत राजू पत्नीला नको नको ते बोलला, नंतर ३ मित्रांनी बदला घेतला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: शहरातील कांचनवाडी परिसरात मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पीत असताना आपल्याच पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तीन मित्रांनी मिळून एका तरुणाचे झाडावर डोकं आदळून त्याची हत्या केली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर, कांचनवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर पांडुरंग काळुबा गायकवाड (वय ४०), युवराज गोरक्ष गायकवाड (वय ३८) आणि सोनू सर्जेराव गव्हाणे (वय ३४, सर्व राहणार कांचनवाडी) या तिन्ही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री राजू वंजारी हा त्याचे मित्र सोनू, युवराज आणि पांडुरंग यांच्यासोबत कांचनवाडीतील वुडरीज स्कूलजवळील मैदानात एका झाडाखाली दारू प्यायला बसले होते. दारूच्या नशेत असताना राजूने स्वतःच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या कारणावरून तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या तिन्ही मित्रांशी त्याचा जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या तिघांनी राजूला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याचे डोकं झाडावर जोरात आदळले. या गंभीर मारहाणीत राजूचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. मृत राजूचे वडील किसन बापूराव वंजारी (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
गरीब कुटुंबाचा एकमेव आधार हरपला…
मूळचा नांदेडचा रहिवासी असलेला राजू गेल्या २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होता. त्याच्या पश्चात वडील, घरी दोन वर्षांपासून पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेली वृद्ध आई, मोलमजुरी करणारी पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. राजू हाच या गरीब कुटुंबाचा एकमेव कमावता आधार होता. मात्र, मित्रांसोबत झालेल्या या क्षुल्लक वादात त्याचा जीव गेल्याने या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मोठा आधार हिरावला गेला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा