Headlines

Mumbai Shivaji Park Student Protest CJP on NEET Paper Leak Small Cylinder found with Minor Boy Crime News; आंदोलकांना पांगवताना अल्पवयीन मुलाकडे गॅस सिलिंडर सापडला, शिवाजी पार्क भागात पोलिसांची कारवाई


Shivaji Park Student Protest : शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. पोलिस या आंदोलकांना पांगवत असताना एका अल्पवयीन मुलाकडे गॅसचा छोटा सिलिंडर आढळल्याची माहिती आहे

Mumbai Shivaji Park Student Protest Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केलेले उपोषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी मध्यरात्री सोडले असले, मात्र वांगचुक आणि सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. दिल्लीप्रमाणे आंदोलन चिघळू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी घेतली आहे. मात्र यासाठी पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. मात्र शिवाजी पार्क परिसरातील आंदोलकांना पांगवताना अल्पवयीन मुलाकडे गॅस सिलिंडर सापडल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे.

पोलीस त्रास देत असल्याचा आरोप

प्रतिबंधात्मक नोटीस पाठवणे, आंदोलनस्थळी जाण्यास रोखणे, घरात डांबून ठेवणे अशा वेगवेगळ्या प्रकारे रोखण्यात येत असल्याने तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विनाकारण त्रास दिला जात असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ८०० ते ९०० जणांविरुद्ध १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिल्लीप्रमाणे मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी घेतली आहे. मात्र यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचा आरोप अनेक तरुण आणि तरुणी करीत आहेत.
Maharashtra TimesDharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, कारण समोर; भाजपच्या हायव्होल्टेज बैठकीत मोठे निर्णय, नेतृत्वाकडून दोन चुकाही मान्य

लोकेशन ऑन, दिवसभराच्या वावरावर नजर

दिवसभर कुठे जाताय यावर नजर ठेवली जात असून पोलिस अधिकारी मोबाइलचे लोकेशन ऑन ठेवण्यास सांगत आहेत. आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी घरातून बाहेर पडू दिले जात नाही. जमावबंदीच्या नावाखाली घराबाहेर पडले, तरी त्याब्यात घेतले जात आहे, असे आरोप आंदोलक करीत असून यावरून पोलिसांविरोधात तीव्र संताप निर्माण होत आहे.

लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप

मुलाकडे गॅस सिलिंडर

दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात गुरुवारीही मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. पोलिस या आंदोलकांना पांगवत असताना एका अल्पवयीन मुलाकडे गॅसचा छोटा सिलिंडर आढळला. पोलिसांनी या मुलाला सिलिंडरसह ताब्यात घेतले. त्याने हा सिलिंडर आंदोलनस्थळी का आणला होता? या मुलावर काही कारवाई करण्यात आली का ? याबाबतचा तपशील मुंबई पोलिसांकडून मिळू शकला नाही.
Maharashtra TimesAbhijeet Dipke : सोनम सरांनी उपोषण सोडल्याचा आनंदच, पण विद्यार्थ्यांचा त्याग वाया जाऊ देणार नाही; अभिजित दिपकेची पहिली प्रतिक्रिया

दीडशे आंदोलक ताब्यात

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली. या आंदोलनाच्या अनुषंगाने ट्रॉम्बे, साकीनाका, मालवणी, दहिसर, बीकेसी, गोरेगाव, चारकोप, मानखुर्द, शिवडी, शिवाजी पार्क येथून दीडशेहून अधिक आंदोलकाना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.