Headlines

Mumbai high courts decision tukaram mundhe fda action against four star hotel revoked; दोन किडे सापडले, तुकाराम मुंढेंनी फोर स्टार हॉटेल केलं बंद; कोर्टात धाव घेताच ‘वास्तववादी’ निर्णय, FDAची कारवाई रद्द


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आपण भारतात आहोत. त्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. हॉटेलकडून नियम व निकषांची पूर्ती ९५ टक्क्यांपर्यंत झाल्याचे तुमच्या तपासणीत निष्पन्न झाले असेल, तर केवळ दोन लहान कीडे आढळल्याच्या कारणावरून हॉटेलमधील खानपान सेवा बंदच ठेवण्याची कठोर कारवाई कायम ठेवणे चुकीचे होईल’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ‘पार्क इन रॅडिसन’ या चार तारांकित हॉटेलवरील खानपान सेवा निलंबनाची कारवाई रद्द केली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २ जुलै रोजी या हॉटेलमध्ये आकस्मिक तपासणी केली असता, परवान्यातील अनेक अटींचा व नियमांचा भंग होत असल्याचे आढळले. त्यामुळे एफडीएने ३ जुलै रोजीच्या आदेशाने अन्नसुरक्षा कायद्याच्या कलम ३२(३)मधील तरतुदींच्या आधारे कारवाई करून अन्नसेवेचा परवाना निलंबित केला होता. मात्र, ‘नागरिकांच्या अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने एफडीएची सुरू असलेली मोहीम प्रशंसनीय असली, तरी कारवाई ही अत्यंत कठोर व नियमभंगाच्या प्रमाणात नाही’, असे म्हणत या हॉटेलचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय निरभवणे यांनी ॲड. मयुर खांडेपारकर यांच्यामार्फत रिट याचिका केली.

‘एफडीएने ज्या तरतुदीच्या आधारे आपले असाधारण अधिकार वापरून आमच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली, ती वास्तविक सार्वजनिक आरोग्याला धोका असल्याच्या अपवादात्मक स्थितीत करता येते. नियमाप्रमाणे आम्हाला सुधारणांची संधी दिल्यानंतरच कठोर कारवाई अपेक्षित होती’, असा युक्तिवाद ॲड. खांडेपारकर यांनी मांडला होता. तर, ‘तपासणीत हॉटेलच्या खानपान सेवेत खूप गंभीर त्रुटी आढळल्या. तपासणीत हॉटेल प्रशासनाला १०८ गुणांपैकी केवळ ६५ गुण मिळाले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना नियमभंग असेल तर कठोर कारवाई योग्यच ठरते’, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील नेहा भिडे यांनी केला. मात्र, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने कठोर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

आज राज्यभरातील अहवाल

एफडीएची कारवाई विशिष्ट आस्थापनांबाबतच होत आहे का, अशी विचारणा करत राज्यभरातील सरकारी, निमसरकारी व वैधानिक संस्थांमधील खानपान सेवांची तपासणी केली आहे का, अशी विचारणा करत अहवाल देण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार, आज, शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत एफडीएकडून अहवाल सादर होणे अपेक्षित आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत