Pimpri Chinchwad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामगाराची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराचा लाकडी पाटाने डोक्यात मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेत आरोपीही गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये, शिंदे गाव (ता. खेड) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरंजीत आणि आरोपी अमरुष हे दोघेही शिंदे गाव येथील युनिटी बिल्ड टेक प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम साइटवर काम करतात. तिथेच असलेल्या लेबर कॅम्पमध्ये दोघेही राहत होते. रविवारी दुपारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने आरोपीने खोलीतील लाकडी पाटाने चिरंजीत यांच्या डोक्यात जोराने मारहाण करून त्यांचा खून केला. या मारामारीत आरोपीही गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचाही मृत्यू झाला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या घडामोडीत, पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून बलात्कार, फसवणूक आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या माळेगाव पोलीस ठाण्यामार्फत चौकशी सुरू असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा