Headlines

BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण? – tukaram mundhe fda action on bmc hq canteen sealed due to unhygienic issue


मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहाच्या स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता अशा ३१ पैकी सर्वच त्रुटी कायम असल्याने गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाने हे उपाहारगृह सील केले. तसेच कंत्राटदार कमल केटरर्स प्रा. लि. याचे खाद्यव्यवसायाचे अन्ननोंदणी प्रमाणपत्रही निलंबित केले.

मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर एफडीएने २२ जुलैला तपासणी केली. पुनर्तपासणीमध्ये सुधारणा सुचनेतील ३१ पैकी सर्व त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता, उपकरणे व परिसराची अपुरी देखभाल, तापमान नियंत्रण प्रणालीतील त्रुटी, आवश्यक स्वच्छता नोंदी अभाव आदी त्रुटी आढळल्या. त्याची दखल घेत २२ जुलैपासून या उपाहारगृहाच्या कंत्राटदाराचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.
Maharashtra TimesMumbai Protest: मुंबईत तरुणीचा दुर्गावतार! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी गाडी अडवली, कोण आहे पोलिसांना नडणारी रिया अहिर?
निलंबनाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे अन्न खरेदी, उत्पादन, विक्री करण्यास मनाई करत हे उपाहारगृह सील करण्यात आले. या उपाहारगृहाच्या ८ जून २०२६ ला केलेल्या तपासणीत स्वच्छतेसह अनेक नियंमांचे उल्लंघन आढळले होते. त्यानंतर एफडीएने सुधारणा सूचना पाठवली. मात्र कंत्राटदाराने खुलासाही केला नाही. त्यानंतर ताकात माशी व अन्य घटना घडल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी केली होती.

स्थायी समितीत पडसाद
स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी उपाहारगृहावरील कारवाईचे पडसाद उमटले. कारवाईची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना सकाळी विचारूनही दुपारपर्यंत मिळू शकलेली नाही, अशी खंत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आणि प्रमुख कामगार अधिकाऱ्यांनी याची माहिती देण्याचे आदेश दिले. बैठकीत दाखल प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांना सदस्य राजेश्री शिरवडकर यांनी कारवाईची माहिती विचारली. ते उत्तर देऊ शकले नाहीत. यानंतर शिंदे यांनी महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Maharashtra TimesMumbai Students Protest : आधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, नंतर खिशात पावडर टाकण्याची धमकी, हर्षवर्धनने सांगितली आपबीती
खाण्याच्या चर्चेवरून नाराजी
स्थायी समितीच्या बैठकीत शाळा इमारतींच्या सुरक्षेचा विषय चर्चेला आला असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. मात्र अध्यक्ष शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची चर्चा सुरू होती. खान यांनी विचारणा केली असता, कॅन्टीन बंद असल्याने चांगला नाश्ता दाखल झाल्याचे अध्यक्षांना सांगत असल्याचे ढाकणे म्हणाले. यावेळी शाळांचा गंभीर विषय सुरू असताना खाद्यपदार्थावर चर्चा करणे योग्य नाही, असे सईदा खान यांनी सुनावले.

तुकाराम मुंढे यांच्यासारखा निडर, प्रामाणिक, कामाशी एकनिष्ठ असलेला अधिकारी जर प्रत्येक खात्यात असेल, तर महाराष्ट्राचं चित्र काही वेगळंच असेल. काय वाटतंय तुम्हाला? कमेंटमध्ये नक्कीच सांगा…

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत