Headlines

‘अजिंक्यवर अन्याय झाला… ऑस्ट्रेलियाला लोळवल्यावरही बाकावर बसवलं’; रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी क्रिकेटर वेंगसरकर उघड बोलले


Dilip Vengsarkar on Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने बुधवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. क्रिकेट वर्तुळातून आजी-माजी खेळाडू प्रतिक्रिया देत असताना माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी त्याच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे.

Dilip Vengsarkar Ajinkya Rahane
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘आपल्या कल्पक नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. मात्र काही महिन्यांतच तो नको व्हावा? अजिंक्यवर अन्याय झाला, असे मला तेव्हापासून वाटते’, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी गुरुवारी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजिंक्यवरील विश्वास कायम ठेवत त्याला संधी द्यायला हवी होती. तो त्या विश्वासास एकशेएक टक्के पात्र होता. मात्र तसे झाले नाही अजिंक्यला नंतर थोड्याफार अंतराने संघाच्या आत-बाहेर करण्यात आले अन् त्यामुळे बहुदा त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला’, असे वेंगसरकर यांनी ‘मटा’शी साधलेल्या संवादादरम्यान सांगितले. २०१८च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्यावेळी रहाणेला केप टाऊन आणि सेंच्युरियन कसोटीसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. अन् त्यानंतर तिसऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले.
Maharashtra TimesAjinkya Rahane Retirement : तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र

‘अजिंक्य म्हणजे हमखास चमकणारे हुकूमी नाणे’

‘मार्च २०१७मधील धरमशाला कसोटीत अजिंक्यच्या नेतृत्वाखालीच भारताने ऑस्ट्रेलियाला लोळवले होते. अन् त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्याला १२वा खेळाडू म्हणून बाकावर बसवले जाते. ते पाहून मलाही आश्चर्य वाटले होते’, असे वेंगसरकर म्हणाले. ‘अजिंक्यचे तंत्र आणि शैली छान होती. त्याचा बचाव तर कसोटीसाठी सर्वोत्तम होता. परदेशातील खेळपट्ट्यांवर अजिंक्य म्हणजे हमखास चमकणारे हुकूमी नाणे. वेगवान गोलंदाजीचा सफाईदारपणे सामना करण्यातही तरबेज. मला वाटते की, तो सातत्याने भारतीय संघात खेळला असता तर बरे झाले असते. सतत आत-बाहेर राहणे आत्मविश्वासासाठी हानिकारक ठरते आणि अजिंक्यचा खेळ पूर्णपणे आत्मविश्वासावर अवलंबून होता’, असे वेंगसरकर यांचे म्हणणे आहे.
Maharashtra TimesMrunal Yashasvi Dating : मृणाल ठाकूरला डेट करतोय यशस्वी जयस्वाल? एका व्हिडिओने रंगलेल्या चर्चांमागचं सत्य काय?

अन् अश्रू अनावर

चाहते, पाठिराख्यांचा उल्लेख झाला अन् अजिंक्यला अश्रू अनावर झाले. ‘क्रिकेटपटू म्हणून आम्ही यशापेक्षा अपयश जास्त पाहतो. माझा संघ सामना हरला. माझ्याकडून चुका झाल्या; पण तुमच्या मनात मी कायमच सर्वोच्च स्थानी राहिलो. तुम्ही मला कधीच परके मानले नाही. तुमच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद. कॅप क्रमांक २७८ आता निरोप घेतो आहे’, असे अजिंक्यने सांगितले. त्याने २०२४-२५ मोसमात मुंबईचे कर्णधारपद भूषवले. त्याच्या नेतृत्वात मुंबईने २०२३-२४ मध्ये रणजी करंडक जिंकला होता.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा