Headlines

Mumbai News: ‘शॉर्टकट’वर बडगा! विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 11579 चालकांवर सहा महिन्यांत कारवाई – mumbai traffic police action against 11579 drivers for driving in wrong direction over 6 months


Mumbai News : सन २०२५मध्ये ११ हजार ७११ चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती.

mumbai traffic
मुंबई ट्राफिक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : वळसा वाचवण्यासाठी ‘शॉर्टकट’ म्हणून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे अपघातही घडतात. अशा प्रकारांवर नियंत्रण आण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी बडगा उगारण्यात येतो. या वर्षी या कारवाईची व्याप्ती वाढली असून पहिल्या सहा महिन्यांत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या तब्बल ११ हजार ५७९ चालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षभरातील कारवाईची संख्या जवळपास इतकी होती.

मे महिन्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने भांडुपच्या ३४ वर्षीय तरुणाच्या पायांना फ्रॅक्चर झाले होते. खारमध्ये दुचाकीवरून गस्त घालत असताना पोलिसाला मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने ते जखमी झाल्याची घटना घडली. असे अनेक अपघात मुंबईत घडत आहेत.

Maharashtra TimesSRA Fraud Mumbai: मुंबईत मोठा SRA घोटाळा; 47 जणांकडून तब्बल 5.57 कोटी लाटले, आमदाराच्या ‘पीए’चाही सहभाग
शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे कोंडीत भर पडते. अशातच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडी वाढते, शिवाय अपघातांनाही निमंत्रण मिळते. यात प्रामुख्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा चालकांना शिस्त लागावी, यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई केली जाते.

पोलिसांनी सन २०२६मध्ये जूनपर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याने ११,५७९ चालकांवर दंडात्मक करवाई केली. या चालकांच्या वाहनांवर ई-चलान जारी करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकदिशा मार्गावर, ‘नो एंट्री’मध्ये प्रवेश करणे, तसेच मुख्य मार्गिकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे.

Maharashtra TimesPravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज, लोकं त्यांना दिल्लीला पाठवण्याची का घाई करत आहेत? प्रवीण दरेकर यांचा सवाल
एक हजार जणांवर गुन्हे
विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघात घडल्यास वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. चालू वर्षात जूनपर्यंत जवळपास एक हजार चालकांविरुद्ध वेगवेगळ्या करण्यात आले आहेत. यातील पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल सर्वाधिक सुमारे ५०० गुन्हे हे पश्चिम उपनगरात दाखल करण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra TimesConversion Act: धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब! विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोर; तुरुंगवास अन् दंडाचीही कायद्यात तरतूद
अलीकडील काही घटना
– अंधेरी अंबोली परिसरात दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या चालकाने नऊ वर्षांच्या मुलीला धडक दिली. यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झाली.
– कुलाबा पोलिसांनी विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालवून वेगात पळणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पकडले
– रिगल जंक्शन येथे समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
– दारूच्या नशेत वेडीवाकडी रिक्षा चालविणाऱ्यास पकड़न दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा