इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे ‘स्टारशिप 40’ रॉकेट पहिल्यांदाच हिंदी महासागरात सुरक्षितपणे आणि अखंड उतरले आहे. अंतराळातून सॅटेलाईटने घेतलेल्या फोटोंमध्ये काही मोठ्या टगबोटी या महाकाय रॉकेटला समुद्रातून दोरीने ओढून आणताना दिसत आहेत. रॉकेट न फुटल्यामुळे कंपनीसाठी ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

सविस्तर माहिती अशी आहे की, इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या 13 व्या ऐतिहासिक चाचणीदरम्यान ( Flight 13 ) हिंदी महासागरात उतरलेले ‘स्टारशिप 40’ रॉकेट सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अंतराळातून एका सॅटेलाईटने टिपलेल्या फोटोंमध्ये काही जहाजे या 170 फूट उंच महाकाय रॉकेटला समुद्राच्या मधोमध दोरीने ओढून आणताना दिसत आहेत. स्टारशिपच्या इतिहासात रॉकेट समुद्रात फुटण्याऐवजी पूर्णपणे अखंड राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सॅटेलाईटच्या फोटोंमधून काय आले समोर?
‘CNN’ च्या (REF.)रिपोर्टनुसार, Vantor या जिओस्पेशिअल इंटेलिजन्स कंपनीने रविवार आणि सोमवारचे सॅटेलाईट फोटो जारी केले आहेत. यामध्ये Normand Ranger आणि Skimmer Tide नावाच्या दोन मोठ्या नॉर्वेजियन टगबोटी स्टारशिपच्या नाकाला लांब दोरी बांधून त्याला ओढताना दिसत आहेत. या मोहिमेत स्पेसएक्सचे मुख्य सपोर्ट जहाज Go Australis देखील सुरुवातीला सोबत होते. मरीन ट्रॅफिकच्या डेटानुसार, ही जहाजे अत्यंत संथ गतीनेरॉकेटला किनाऱ्याकडे आणत आहेत. (REF.)
‘ड्रीम सिनॅरिओ’: रॉकेट का फुटले नाही?
‘India Today’ ने दिलेल्या वृत्तानुसार, 24 जुलै 2026 रोजी उड्डाण केलेल्या या रॉकेटचे लँडिंग इतके मऊ आणि अचूक होते की, पाण्याच्या संपर्कात आल्यावरही त्याचे इंधन टँक लीक झाले नाहीत. त्यामुळे ते समुद्रात बुडण्याऐवजी सलग 5 दिवस पाण्यावर तरंगत राहिले. ‘Space.com’ च्या (REF.) हवाल्याने 28 जुलै रोजी स्वतः इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले होते की, आधी कोणतीही योजना नसतानाही रॉकेट अखंड राहिल्यामुळे आम्ही ते समुद्रातून रिकव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंजिनिअर्सना मिळणार मोलाचा खजिना
‘Times of India’ च्या (REF.) विश्लेषणानुसार, यापूर्वीच्या चाचण्यांमध्ये रॉकेट समुद्रात पडताच त्याचे तुकडे होत होते किंवा स्फोट होत असे. मात्र, आता संपूर्ण रॉकेट हातात आल्यामुळे इंजिनिअर्सना खालील गोष्टींचा थेट अभ्यास करता येईल. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना रॉकेटच्या उष्णता रोधक कवचाने किती तापमान सहन केले. पाण्याचा दाब आणि आगीशी सामना करताना रॉकेटच्या संरचनेला कुठे तडे गेले का.
भविष्यातील फायदा
हा डेटा नासाच्या ‘आर्टेमिस’ चंद्र मोहीम आणि इलॉन मस्क यांच्या मंगळ मोहिमेसाठी ‘री-यूझेबल’ रॉकेट बनवण्यासाठी गेम-चेंजर ठरेल

