Mumbai House Fraud: म्हाडाचे घर योजनेत मिळवून देतो सांगून गोरेगावमध्ये २७ जणांची ५६ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणविक्रेते राकेश गुप्ता यांच्या तक्रारीवरून अनिता तलावडे, दिव्येश प्रसाद आणि अंकिता प्रसाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या राकेश यांच्या शेजारी अनिता तलावडे राहतात. गुप्ता घराच्या शोधात असल्याची माहिती असल्याने त्यांनी म्हाडाच्या योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याचे सांगितले. दिव्येश आणि अंकिता यांची म्हाडात ओळख असून ते विविध योजनांमध्ये स्वस्तात घरे मिळवून देतात, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर तलावडे यांनी गुप्ता यांची प्रसाद दाम्पत्याशी ओळख करून दिली.
Ganeshotsav Special Trains: चाकरमान्यांच्या खिशाला कात्री! गणेशोत्सव विशेष गाड्यांसाठी नियमितपेक्षा दीड-दुप्पट भाडे, पण तरीही सेवेची बोंबगोरेगावच्या प्रेमनगरमध्ये एक बीएचके घर १८ लाख रुपयांत मिळवून देण्याचे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. राकेश यांनी तीन लाख रुपये देऊन दोन घरांची मागणी केली. त्यानंतर मोठे घर उपलब्ध असल्याचे सांगत प्रसाद दाम्पत्याने आणखी साडेतीन लाख रुपये घेतले. मात्र, पैसे देऊन बराच कालावधी उलटूनही घर मिळाले नाही. विचारणा केल्यावर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
संशय आल्याने राकेश यांनी चौकशी केली असता, त्यांच्याप्रमाणेच अन्य अनेकांकडून या तिघांनी पैसे घेतल्याचे समोर आले. राकेश यांनी माहिती गोळा केल्यानंतर २७ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
Dr Surdas on Ajit Pawar : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावं‘ओटीपी’मुळे बसला विश्वास
पैसे दिल्यानंतर दोन्ही वेळा राकेश यांच्या मोबाइलवर म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्याचा ओटीपी आला. त्यामुळे त्यांचा आरोपींवर विश्वास बसला. आरोपींनी त्यांच्याकडून ओळखपत्रांसह अन्य आवश्यक कागदपत्रेही घेतली.

