Headlines

Mumbai Fraud: घराचे स्वप्न राहिले अपूर्णच! गोरेगावात 27 जणांना गंडवलं, तब्बल 56 लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा – mumbai house 56 lakh fraud under guise of 27 duped in goregaon case registered against 3 peoples


Mumbai House Fraud: म्हाडाचे घर योजनेत मिळवून देतो सांगून गोरेगावमध्ये २७ जणांची ५६ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

mumbai house fraud
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी काहीही करण्याची सर्वसामान्यांची तयारी असते. याचा गैरफायदा घेत, म्हाडाचे घर योजनेत मिळवून देतो सांगून गोरेगावमध्ये अनेकांना फसविण्यात आले आहे. यात, २७ जणांची सुमारे ५६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणविक्रेते राकेश गुप्ता यांच्या तक्रारीवरून अनिता तलावडे, दिव्येश प्रसाद आणि अंकिता प्रसाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या राकेश यांच्या शेजारी अनिता तलावडे राहतात. गुप्ता घराच्या शोधात असल्याची माहिती असल्याने त्यांनी म्हाडाच्या योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याचे सांगितले. दिव्येश आणि अंकिता यांची म्हाडात ओळख असून ते विविध योजनांमध्ये स्वस्तात घरे मिळवून देतात, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर तलावडे यांनी गुप्ता यांची प्रसाद दाम्पत्याशी ओळख करून दिली.

Maharashtra TimesGaneshotsav Special Trains: चाकरमान्यांच्या खिशाला कात्री! गणेशोत्सव विशेष गाड्यांसाठी नियमितपेक्षा दीड-दुप्पट भाडे, पण तरीही सेवेची बोंबगोरेगावच्या प्रेमनगरमध्ये एक बीएचके घर १८ लाख रुपयांत मिळवून देण्याचे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. राकेश यांनी तीन लाख रुपये देऊन दोन घरांची मागणी केली. त्यानंतर मोठे घर उपलब्ध असल्याचे सांगत प्रसाद दाम्पत्याने आणखी साडेतीन लाख रुपये घेतले. मात्र, पैसे देऊन बराच कालावधी उलटूनही घर मिळाले नाही. विचारणा केल्यावर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

संशय आल्याने राकेश यांनी चौकशी केली असता, त्यांच्याप्रमाणेच अन्य अनेकांकडून या तिघांनी पैसे घेतल्याचे समोर आले. राकेश यांनी माहिती गोळा केल्यानंतर २७ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

Maharashtra TimesDr Surdas on Ajit Pawar : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावं‘ओटीपी’मुळे बसला विश्वास
पैसे दिल्यानंतर दोन्ही वेळा राकेश यांच्या मोबाइलवर म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्याचा ओटीपी आला. त्यामुळे त्यांचा आरोपींवर विश्वास बसला. आरोपींनी त्यांच्याकडून ओळखपत्रांसह अन्य आवश्यक कागदपत्रेही घेतली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा