Headlines

Mumbai Byculla Moharram Devotees given Rat Killing Pills Attempt to Kill 30 Thousnad Devotees; मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट


Byculla Devotees were Poisoned During Moharram : मुंबईतच मोठा घातपात घडवण्याचा डाव होता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. एक इसम हा मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या पेन किलर म्हणून वाटप करत होता.

Byculla Devotees were Poisoned During Moharram
भायखळा मोहरम उंदीर मारण्याच्या गोळ्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. शुक्रवारी भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या (झिंक फॉस्फेट) गोळ्या वाटण्यात येत होत्या. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यावर पेनकिलरच्या नावाखाली विषाच्या गोळ्या वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले.

३० हजार रिकाम्या कॅप्सुल

पोलिसांनी त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त केल्या. भाविकांना विषाच्या गोळ्या देण्यामागे फैयाज याचा नेमका कोणता उद्देश होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भायखळा येथील मिरवणुकीत हजारोंच्या गर्दींमध्ये एक तरुण कॅप्सूल वाटत होता. मिरवणुकीत जखमा करून घेणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हर्बल पेन किलर गोळ्या असल्याचे तो सांगत होता. याचदरम्यान सलमान सय्यद याला उलट्या होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी फैयाज याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची तपासणी केली. दरम्यान, फैयाज याने ५० किलो झिंक फॉस्फेस्टची पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सुलची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
Maharashtra TimesPraful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

पोलिसांची गर्दीमध्ये स्पीकरवरुन घोषणा

गर्दीत वाटल्या जाणाऱ्या गोळ्या विषारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गर्दीमध्ये जाऊन स्पीकरवर घोषणा केली. यामुळे फैयाज याने वाटलेल्या कॅप्सूल अनेकांनी घेण्याचे टाळले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा फैयाज प्रेमजी हा १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता, असे तपासातून समोर आले आहे. भाविकांवर विषप्रयोग करण्याचा कट त्याचा एकट्याचाच आहे की, अन्य कुणाचा यामध्ये सहभाग आहे याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maharashtra TimesMonsoon Update: १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं

घातपात की दहशतवादी कट?

पोलिसांनी अटक केलेल्या फैयाज याने इराण आणि इराकची वारी केल्याचे उघडकीस आलं आहे. उच्चशिक्षित असलेल्या फैयाजन केलेले हे कृत्य घातपात आहे की, दहशतवादी कट या तपास पोलिस करीत आहेत. कुणाकडून प्रेरित होऊन त्याने हे पाऊल उचलले का, याबाबतही चौकशी केली जात आहे. यासाठी त्याचा मोबाइल, आर्थिक व्यवहार याची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा