Headlines

Raj Thackeray On IPS Vishwas Nangare Patil RSS Programe | राज ठाकरेंनी सुनावलं – raj thackeray on ips vishwas nangare patil


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरमधील रेशीम बागेतील संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरस्तुतीसुमनं उधळली… यावरून काँग्रेसनं रान पेटवलं. खाकी वर्दीतील अधिकारी की संघाचा प्रचारक असा निशाणा साधत काँग्रेसनं घणाघात केला होता. तर आज विश्वास नांगरेंना दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा असेल आणि त्यांना संघाशी प्रेम असेल तर, सेवेतून राजीनामा द्या, संघात सामील व्हा असाच संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल गुडधे यांनीही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील अर्बन नक्षल म्हणून माझ्या जीवावर उठतील असा मोठा आणि गंभीर आरोप केलाय. नांगरेंनी हजेरी लावलेल्या कार्यक्रमाचं नेमकं प्रकरण काय… मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या कार्यक्रमाची चौकशी करण्यासोबतच नांगरेच्या खाकी वर्दीचा रंग संघाचा असल्याचं का म्हटलं, तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !असा सल्ला का दिला आणि काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंनी काय गंभीर दावा केलाय तेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत