Headlines

Mumbai Building Collapse: मुंबईत घरांची पडझड नित्याचीच; साडेपाच वर्षांत 1175 घटना, 76 जणांचा करुण अंत – mumbai 1175 building collapse incidents over 5.5 years 76 tragic deaths 339 injured


Mumbai Building Collapse: शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणात झोपड्या आणि चाळी असून, अनेक ठिकाणी दुमजली-तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. या घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात होत आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-14T123036
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईत धोकादायक घरे आणि घरांचे भाग कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत असून, त्यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचीही हीच स्थिती आहे. इमारतींचे भाग, छत कोसळण्याच्या घटनांमध्येही मुंबईकरांचा बळी जात आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत मुंबईत घरे कोसळणे, घरांचे आणि इमारतींचे भाग कोसळणे यासंबंधी १,१७५ घटना घडल्या आहेत. यामध्ये ७६ जणांचा मृत्यू झाला, तर ३३९ जण जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक घटना पावसाळ्यात घडल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांत घर, घराचा भाग किंवा इमारतींचा भाग कोसळण्याच्या १,१७५ घटना घडल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०२१मध्ये घर कोसळण्याच्या २३४ घटना घडल्या होत्या. त्यात ७५ जण जखमी झाले, तर २२ जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesE Challan : वाहतूक नियम मोडल्याचं चालान आल्यास घाई करा, हरकतीस केवळ 45 दिवसांची मुदत, दुर्लक्ष केल्यास दंड अनिवार्य२०२२मध्ये २३२ घटना घडल्या. त्यात ७३ जण जखमी झाले, तर २५ जणांचा मृत्यू झाला. २०२३मध्ये घटनांची संख्या २३२ होती आणि यामध्ये मृतांची संख्या आठ होती. २०२४मध्ये घर कोसळण्याच्या घटना वाढून २६६ झाल्या. या दुर्घटनांमध्ये ७५ जण जखमी झाले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. २०२५मध्ये २११ घटनांची नोंद झाली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात ७ जुलैपर्यंत अशा ६०९ घटना घडल्या आहेत.

वृक्ष कोसळून एकूण ११ जणांचा मृत्यू
२०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या एकूण ८ हजार ८३५ घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १४४ जण जखमी झाले आहेत. २०२१ ते २०२५च्या तुलनेत २०२६ या वर्षात झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना अधिक आहेत. गेल्या सात महिन्यांतच झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या तब्बल २ हजार २९८ घटना घडल्या आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले आहेत.

Maharashtra TimesBhavesh Kaware: मी नॉन व्हेजबाबत तशी जाहिरात टाकली कारण मालक वारकरी; तरुणाचा खुलासा, पण मनसेचा आक्रमक इशारा!पाऊस नसतानाही दुर्घटनासत्र
मुंबईत पावसाळापूर्व कामांमध्ये मुंबई महापालिकेकडून झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम केले जाते. तसेच, धोकादायक झाडे किंवा फांद्यांचा धोका असल्यास त्याची माहिती महापालिकेला देण्याच्या सूचना रहिवासी भागांत केल्या जातात. मात्र पावसाळ्याशिवाय इतर काळातही, तसेच पावसाळ्यात झाडांचा धोका वाढला असून तो कायम असल्याचे चेंबूरमधील दुर्घटनेनंतर समोर आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा