Headlines

MPSC Exam Paper Leak Rutuja Patil advised to write 10 wrong answers to avoid suspect Crime News; संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डील


Rutuja Patil : परीक्षेपूर्वी ऋतुजा पाटील हिला ७७ प्रश्न मिळाले होते. त्यासाठी तिच्या वडिलांनी बारा लाख रुपये मोजले होते. ऋतुजाच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम त्यांनी ती औषध निरीक्षक होण्यासाठी वापरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

MPSC Paper Leak Rutuja Patil Gaurav Patil Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मार्च महिन्यात घेतलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. परीक्षेपूर्वी ऋतुजा पाटील हिला ७७ प्रश्न मिळाले होते आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी बारा लाख रुपये मोजले होते. तिच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम त्यांनी ती औषध निरीक्षक होण्यासाठी वापरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या प्रकरणात दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. आरोपींनी आणखी उमेदवारांना प्रश्न दिल्याचा संशय असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बारा लाखांना ७७ प्रश्न

अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी एमपीएससी मार्फत घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वी काही दिवस आधी तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातून ७७ प्रश्न प्राप्त करून त्याचा वेगळा प्रश्नसंच तयार करून तो पुढे इतर व्यक्तींना उपलब्ध करून दिल्याची माहिती लोकेश उर्फ गौरव पाटील या तरुणाने ‘एमपीएससी’ला दिली. ऋतुजाला काही प्रश्न चुकीचे सोडवण्याचाही सल्ला देण्यात आला होता, जेणेकरुन संशय येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra TimesRajkumar Jaat : कपडे काढले, 51 किमी चालत राहिला, 23 वर्षीय UPSC उमेदवाराची बॉडी सापडली, कुटुंबीयांचे गंभीर आरोप

सहा जणांना अटक

या प्रकरणात गुन्हा दाखल करून मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ‘एमपीएसी’चे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, ज्या मुलीला प्रश्न मिळाले त्या ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली असून, हे सर्व आरोपी दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी आहेत.

ऋतुजा पाटीललाही नोटीस

आरोपींच्या चौकशीत ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी प्रश्नांसाठी बारा लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले. अमृत यांनी प्रवीण पाटील याच्याकडे पैसे दिले आणि त्याने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. दरम्यान या प्रकरणातील एक दुवा असलेला मयूर ठाकरे याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे ऋतुजा हिलाही नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesNagpur Crime : पतीचं निधन, पदरी दोन मुलं; लग्नाच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याच्या बॉडीगार्डवर गुन्हा

जुने मोबाईल नादुरुस्त

अभिजित लेंडगे आणि प्रवीण पाटील यांना पोलिसांनी त्यांचे मोबाइल जमा करण्यास सांगितले. त्या वेळी या दोघांनी नवीन मोबाइल पोलिसांना दिले. परीक्षेपूर्वी देखील हे मोबाइल वापरत होता का? असे विचारले असता नाही असे उत्तर दोघांनी दिले. जुने मोबाइल खराब झाल्याचे कारण त्यांनी पुढे केले. इतकेच नाही तर पैशाच्या देवाणघेवाणीबाबत काहीच आठवत नसल्याचे दोघांनी सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.