8th Pay Commission Implementation Delay Arrears Payout: आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत होणाऱ्या संभाव्य विलंबामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो आणि थकबाकीचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. साधारणतः अशी थकबाकी केवळ मूळ वेतनावरच लागू होते, त्यात महागाई भत्ता किंवा घरभाडे भत्ता यांसारख्या भत्त्यांचा समावेश होत नाही.

8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नुकसान
नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस होणाऱ्या विलंबामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्त्यांची थकबाकी मिळणार नाही. या विलंबामुळे महागाई भत्ता, HRA आणि TPTA यांच्या थकबाकीवर परिणाम होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम होईल.
Subhash Chandra Loan Haircut: सुभाष चंद्रांना 22 हजार कोटींच्या कर्जमाफीविरुद्ध एचडीएफसीचा एल्गार; एनसीएलटी निकालाविरुद्ध अपीलमागील वेतन आयोगांच्या इतिहासानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना केवळ बेसिक पगारावरच थकबाकी मिळते. जोपर्यंत विशिष्ट घोषणा होत नाही, तोपर्यंत भत्त्यांवर कोणतीही थकबाकी दिली जात नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, HRA आणि TPTA यांची थकबाकी मिळणार की नाही याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नाही.
अशा परिस्थितीत, आठवा वेतन आयोग लागू होण्यास होणाऱ्या उशिराच थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातील या महत्त्वाच्या भागांवर होईल.मे 2027, ऑगस्ट 2027 किंवा डिसेंबर 2027 मध्ये आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास लेव्हल 3 ते 6 मधील कर्मचाऱ्यांचे 3.45 लाखांपर्यंत मोठं नुकसान होऊ शकतं.
लेव्हल 3 ते 6 मधील कर्मचाऱ्यांच्या नुकसानीचे गणित
आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास बेसिक पगारात लक्षणीय वाढ होईल आणि यामुळे घरभाडे भत्ता व TPTA आपोआप वाढेल. पण मे 2027, ऑगस्ट 2027 किंवा डिसेंबर 2027 मध्ये अंमलबजावणीस विलंब झाल्यास अनुक्रमे 17 महिने, 20 महिने आणि 24 महिन्यांच्या थकबाकीचे नुकसान होऊ शकते.
लेव्हल 3 कर्मचाऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान
| वर्णन | वर्तमान (7 वा वेतन आयोग) | अंदाजे (8वा वेतन आयोग) |
| फिटमेंट फॅक्टर | —- | 2.1x |
| बेसिक पगार | 21,700 रुपये | 45,570 रुपये |
| घरभाडे भत्ता (मूळ वेतनाच्या 24%) | 5,208 रुपये | 10,937 रुपये |
| TPTA (62% डीए वर) | 5,832 रुपये | 12,247 रुपये |
| HRA + TPTA | 11,040 रुपये | 23,184 रुपये |
| मे 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 1,87,680 रुपये |
| ऑगस्ट 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,20,800 रुपये |
| डिसेंबर 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,66,688 रुपये |
लेव्हल 4 कर्मचाऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान
| विवरण | मौजूदा (7th CPC) | अनुमानित (8th CPC) |
| फिटमेंट फॅक्टर | —- | 2.1x |
| बेसिक पगार | 25,500 रुपये | 53,550 रुपये |
| HRA (मूळ वेतनाच्या 24%) | 6,120 रुपये | 12,852 रुपये |
| TPTA (62% डीए वर) | 5,832 रुपये | 12,247 रुपये |
| HRA + TPTA | 11,952 रुपये | 25,099 रुपये |
| मे 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,03,184 रुपये |
| ऑगस्ट 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,39,040 रुपये |
| डिसेंबर 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,88,576 रुपये |
लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान
| वर्णन | वर्तमान (7 वा वेतन आयोग) | अंदाजे (8वा वेतन आयोग) |
| फिटमेंट फॅक्टर | —- | 2.1x |
| बेसिक पगार | 29,200 रुपये | 61,320 रुपये |
| HRA (मूळ वेतनाच्या 24%) | 7,008 रुपये | 14,717 रुपये |
| TPTA (62% डीए वर) | 5,832 रुपये | 12,247 रुपये |
| HRA + TPTA | 12,840 रुपये | 26,964 रुपये |
| मे 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,18,280 रुपये |
| ऑगस्ट 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,56,800 रुपये |
| डिसेंबर 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 3,09,888 रुपये |
लेव्हल 6 कर्मचाऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान
| वर्णन | अंदाजे (8वा वेतन आयोग) | अंदाजे (8वा वेतन आयोग) |
| फिटमेंट फॅक्टर | —- | 2.1x |
| बेसिक सैलरी | 35,400 रुपये | 74,340 रुपये |
| HRA (मूळ वेतनाच्या 24%) | 8,496 रुपये | 17,842 रुपये |
| TPTA (62% डीए वर) | 5,832 रुपये | 12,247 रुपये |
| HRA + TPTA | 14,328 रुपये | 30,089 रुपये |
| मे 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,43,576 रुपये |
| ऑगस्ट 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 2,86,560 रुपये |
| डिसेंबर 2027 मध्ये लागू झाल्यास होणारे नुकसान | —- | 3,45,600 रुपये |
वरील गणित अंदाजित आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने अंतिम फिटमेंट फॅक्टर, घरभाडे भत्ता आणि एकूण TPTA नवीन दर अधिकृत जाहीर केल्यावरच प्रत्यक्ष नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल.

