Moody’s Global Economy Prediction: मूडीज ॲनालिटिक्सच्या अलीकडच्या अहवालामुळे जागतिक बाजरीची धडधड वाढली आहे. मूडीज ॲनालिटिक्सने म्हटले आहे की जागतिक अर्थव्यवस्था पुढील 2 वर्षांत मंद गतीने वाढीच्या टप्प्याकडे वाटचाल करत असून भारताची गतीही मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे नवीन ऊर्जा धक्का बसण्याची, महागाई पुन्हा वाढण्याची आणि मध्यवर्ती बँकांना कठोर चलनविषयक धोरण अवलंबण्यास भाग पाडले जाऊ शकते.

मूडीज ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार 2026 मध्ये जगाची आर्थिक वाढ 2.5% पर्यंत मंदावण्याची आणि त्यानंतर 2027 मध्ये 2.8% पर्यंत वागणे वाढण्याचा अंदाज आहे. या काळात सर्वसाधारण आर्थिक घडामोडींमध्ये घट होताना भारताची वाढही किंचित मंदावण्याची शक्यता आहे.
जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात
‘ग्लोबल आउटलूक: रनिंग हॉट, रनिंग कोल्ड’ या ताज्या अहवालात मूडीज ॲनालिटिक्सने म्हटले आहे की भू-राजकीय संघर्ष, व्यापारातील अडथळे आणि सततच्या वाढत्या महागाई या घटकांचा परिणाम होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात प्रवेश करत आहे. पण मूडीजने पुढे म्हटले आहे की, या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी राहण्याचे अपेक्षित असले तरीही विकासावाढ किंचित मंदावेल, असे अहवालात नमूद केले आहे.
AI बूमने मंदीचा प्रभाव घटला
याशिवाय मूडीजने आपल्या अहवालात पुढे म्हटले की, AI गुंतवणूक चक्र जागतिक मंदीचा प्रभाव कमी करणारा सर्वात मोठा घटक म्हणून उदयास आला. “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तेजीमुळे मोठी आर्थिक घसरण टळली,” असे अहवालात पुढे नमूद केले.
तसेच एआयच्या प्रचंड मागणीमुळे सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि संगणकीय पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला चालना मिळाली तसेच, आशियातील तंत्रज्ञान-आधारित अर्थव्यवस्थांना होणाऱ्या निर्यातही वाढली.
मूडीज अनॅलिटीक्सने म्हटले की एआयच्या तेजीचे फायदे एकसारखे मिळालेले नाही. यामुळे ‘K-आकाराची जागतिक अर्थव्यवस्था’ निर्माण झाली, जिथे तंत्रज्ञान मूल्य साखळीशी जोडलेल्या अर्थव्यवस्था आणि उद्योग, वाढत्या ऊर्जा खर्च आणि कमी मागणीशी झगडणाऱ्यांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत. याचा परिणाम म्हणजे ‘के’ आकाराची जागतिक अर्थव्यवस्था, जिथे काही देश आणि उद्योग वेगाने भरभराटीला आले, तर इतर मागे पडत आहेत.
पश्चिम आशिया संघर्षामुळे महागाई वाढली
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे एनर्जी आणि अन्नधान्याच्या किमती वाढून महागाईला चालना मिळाल्याचेही अहवालात पुढे म्हटले. तसेच अमेरिकेच्या टॅरिफ धोरणासंदर्भातील अनिश्चितता आणि नवीन व्यापारी धोकेही निर्माण झाले आहेत.
अशा परिस्थितीत, आता मध्यवर्ती बँकांसमोर आता एक कठीण धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आल्याचे अहवालातून पुढे इशारा दिला गेला. पुरवठ्यामुळे होणाऱ्या महागाईवर उपाययोजना न करता कठोर चलनविषयक धोरणामुळे आधीच कमी असलेली मागणी आणखी कमी होऊ शकते.
अमेरिका-चीनच्या आर्थिक वाढीला ग्रहण
2026 आणि 2027 मध्ये अमेरिकेच्या जीडीपी वाढीचा दर सरासरी 2% राहू शकतो तर, चीनची वाढ या वर्षी 4.6% आणि पुढील वर्षी 4.2% पर्यंत मंदावण्याचे मूडीज ॲनालिटिक्सने भाकीत केले आहे.

