Headlines

MomsMade Business Success Story ; आई-मुलाच्या जोडीने केली कमाल! घरातून सुरु केला बिझनेस, आज कोटींचा टर्नओव्हर


आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये नाव करणाऱ्या अनेक जोडींबद्दल ऐकून असाल पण आईच्या हातची चव देणाऱ्या ‘MomsMade’ हे ब्रँड जरा अनोखे आहे. आई-मुलाच्या जोडीने बंगळुरू येथे एका लहानशा घरातून व्यवसायाला सुरुवात केली होती. आज या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 15 कोटी रुपये इतका आहे. जर सातत्य आणि जिद्द असेल तर अनेक गोष्टी साध्य होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘Momsmade’ या ब्रॅण्डची यशोगाथा!

MomsMade Business Success Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
व्यवसाय करण्याची इच्छा तर अनेकांची असते पण या क्षेत्रात प्रत्येकाची जहाज टिकत नाही. व्यवसाय क्षेत्राच्या या सागरात अपयशाच्या अनेक लाटा असतात, या लाटांवर ज्याची जहाज टिकते, त्यालाच यशाचा किनारा गाठता येतो. आपण आपल्या आयुष्यात अनेक व्यवसाय बुडताना पहिले असतील, अनेक व्यवसाय आकाशाच्या दिशेने उंच झेप घेताना पाहिले असतील. या दोन्ही गोष्टींमध्ये काही पैलू सामान्य दिसून येतात. जिद्द, मनोबल, तपश्चर्या! ज्याच्याकडे असते तो यश मिळवतोच आणि जो या पैलूंना आत्मसात करण्यापेक्षा यांपासून दूर पळतो त्याला या क्षेत्रात भविष्य नसतं.

बंगळुरू येथे राहणाऱ्या आई-मुलाच्या जोडीने कमालच केली आहे. मूळची बिहार येथे राहणारी वीणा देवी. आयुष्याचे 15 वर्ष त्यांनी शिक्षणाच्या सेवेत दिले. बिहार येथील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या. काही वर्षांनी मुलगा समीरसोबत त्या बंगळुरू येथे स्थायिक झाल्या. नव्या शहरात त्यांना नवे विकल्प सुचले. ज्या ठिकाणी वीणा देवी आणि त्यांचा मुलगा राहत होता, त्या परिसरात अनेक महिला मंडळी त्यांच्या घरातून फूड बिझनेस करत होत्या. येथूनच, वीणा आणि त्यांच्या लेकाला त्यांच्या घरची चव बंगळुरूला चाखण्याची चटक लागली.

ठेकुआ बिहारची पारंपारिक मिठाई आहे. वीणा आणि समीरने याच मिठाईचा व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना काही अडचणी आल्या. मिठाईला फार मागणी मिळाली नाही. पण त्यांनी सातत्य सोडले नाही. हळू हळू त्यांच्या मिठाईला मागणी वाढली. वाढत्या मागणीला पाहून त्यांनी ठेकूआ बनवण्यासाठी लागणाऱ्या साम्रगीत एकपणा ठेवला, जेणेकरून चव सारखीच राहील. या व्यवसायाने पुढे मोठी झेप घेतली. ही झेप इतकी उंच होती की विविध गुंतवणूकदारांनी आई-मुलाच्या जोडीच्या या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

Maharashtra TimesNPS Pension : कशी ठरते पेन्शनची रक्कम? रिटायरमेंटच्या आधी हे गणित समजून घ्या, एकदाच काढता येते लाखोंची रोखआज वीणा आणि समीरच्या या ‘Moms Made’ ब्रँडची नेटवर्थ 15 कोटी रुपये इतकी आहे. एखादा लहानशा व्यवसाय जर सातत्याने आणि जिद्दीने केले तर त्याचेही वटवृक्ष होण्यास फार वेळ लागत नाही याचे उत्तम उदाहरण वीणा आणि समीर या माय-लेकाचा ब्रँड ‘Moms Made’ आहे. आज ते फक्त व्यवसाय करत नाही आहेत तर 50 घरांचे पोट त्यांच्या व्यवसायामुळे चालत आहेत. त्यांनी तेथील 50 महिलांना काम करण्याची संधी दिली आहे. ठेकुआसह इतर खाद्य पदार्थ तसेच उत्कृष्ट घरगुती मिठाईची चव ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहेत आणि प्रयत्न आहेत.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा