Headlines

MNS Leader Avinash Jadhav Angry on Thane Auto Rickshaw Driver Beat Old Man


ठाण्यात एका वयस्कर व्यक्तीला एका ओला रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या घटनेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला.

Avinsh Jadhav
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : ठाण्यात एका वयोवृद्ध व्यक्तीला रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव हे आक्रमक झाले. मनसे नेते अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह आज ठाण्याच्या विवियाना मॉल परिसरात दाखल झाले. इथे उभ्या असलेल्या ओला आणि उबर रिक्षा चालकांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला आणि तिथून त्यांना हुसकावून लावले. यावेळी पत्रकारांनी अविनाश जाधव यांना कायदा हातात का घेतात? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“आम्ही कायदा हातात घेतो, मग काल त्याने हातात घेतलं होतं ते काय होतं? हे लोकं ठाण्याच्या मुख्य रस्त्याला गाडी लावतात. त्यानंतर स्टेरिंगवर दोन्ही पाय लावतात आणि मोबाईलमध्ये खेळत बसतात. पार्किंगला गाड्या लावण्याची ही जागा आहे का? जेवढे ओलावाले भेटले त्यातील एकही मराठी नाहीय. माझं मत आहे, नीट पोट भरा आणि निघा. आमच्या इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करु नका. आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर जबरदस्त माज आमच्यामध्ये सुद्धा आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सैनिक आहोत. तुम्ही आमच्या लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर चुकीचं वागायला अजिबात वाईट वाटणार नाही”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

पोलिसांनी आरोपीला धडा शिकवण्याची मागणी

“उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, संबंधित रिक्षा चालकावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल होणार. मी पोलिसांना सांगितलं की, उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तेच करा. केस टिकेल की नाही ते नंतर बघू. पण आता त्यांना भीती बसली पाहिजे की, अशाप्रकारचं कृत्य केलं तर आपल्यावर कायद्याचा बडगा बसतो. पोलिसांना चांगली संधी आहे. अशा लोकांना धडा शिकण्याची वेळ आहे”, असं अविनाश जाधव म्हणाले.

“त्यांनी आमच्या लोकांना मारल्यावर काही होत नाही. आम्ही मारल्यावर लगेच त्याचं समर्थन होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उचललं जातं. वारे वा! असं कसं होईल? एका वृद्ध माणसाला, 80 ते 85 वर्षांच्या माणसाला दगड टाकेपर्यंत मारताना त्याला लाज वाटली नाही. आम्हाला का लाज वाटली पाहिजे? यातून एक-एक प्रवृत्ती तयार होते. अशा लोकांना जागेवरच ठेचलं पाहिजे. काय व्हायचं ते होऊ द्या”, अशी आक्रमक भूमिका अविनाश जाधव यांनी मांडली.

मराठी येते त्यालाच परमीट देण्याची मागणी

“माझं मत आहे की, जे लोकं 15 वर्षे राहून मराठी शिकले नाहीत ते दोन धडे देवून मराठी शिकणार नाहीत. ज्याला मराठी येते त्यालाच परमीट मिळेल हा नियम लागू करावा. तरच काहीतरी होईल. नाहीतर अशा घटना रोज घडतील”, असं जाधव म्हणाले.

राज ठाकरे यांचा फोन आल्याचा अविनाश जाधवांची माहिती

“मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याची चौकशी केली, विचारपूस केली, तसेच मारहाण करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवण्याच्या शैलीबद्दल सांगितलं आहे. हे कृत्य ज्याने केलं आहे त्याला आम्ही सोडणार नाहीत हे नक्की”, अशी भूमिका अविनाश जाधव यांनी मांडली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा