तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला एक प्रिमियम आणि उपयुक्त गॅझेट गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर मोटोरोलाने एक उत्तम पर्याय आणला आहे. कंपनीने आपली नवीन Moto G Max भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे. 7,000mAh ची मोठी बॅटरी आणि प्रिमियम लुक असलेला हा फोन बहिणीसाठी एक परफेक्ट गिफ्ट ठरू शकतो. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

डिझाईन आणि मजबुती
Moto G Max मध्ये पहिल्यांदाच जी-सिरीजच्या लाइनअपमध्ये ‘सॅटिन-टेक्सचर्ड फिनिश’ देण्यात आले आहे, ज्यामुळे फोनवर बोटांचे डाग आणि चरे पडत नाहीत. हा फोन पॅन्टोनने क्युरेट केलेल्या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे: स्टारगेझर, अलास्कन ब्लू आणि मलागा.
मोटोरोलाने या फोनच्या बॉडीमध्ये सुरक्षेचे आणि मजबुतीचे जागतिक दर्जाचे मानके दिले आहेत.
ग्लास प्रोटेक्शन: स्क्रीनला स्क्रॅच आणि पडल्यानंतर सुरक्षित ठेवण्यासाठी समोरच्या पॅनलवर ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i’ चे मजबूत संरक्षण देण्यात आले आहे.
हवामानापासून संरक्षण: धूळ आणि पाण्याचे हलके थेंब/शिंतोडे यांच्यापासून संरक्षणासाठी या फोनला SGS-प्रमाणित IP64 रेटिंग मिळाले आहे.
स्ट्रक्चरल रेटिंग: अचानक बसणारे धक्के आणि कंपन सहन करण्यासाठी हा फोन MIL-STD-810H या मिलिट्री-ग्रेड मानकांचे तंतोतंत पालन करतो.
कॅमेरा सेटअप आणि फीचर्स
या फोनचा रिअर कॅमेरा सेटअप 50-मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरभोवती डिझाईन केला असून, त्यात प्रगत इमेज प्रोसेसिंग टूल्स देण्यात आले आहेत. मुख्य कॅमेरा: यात 50MP चा Sony LYTIA 600 सेन्सर आहे. हा सेन्सर कमी प्रकाशात उत्कृष्ट फोटो काढण्यासाठी ‘क्वाड पिक्सेल बिनिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करतो. दुसरा कॅमेरा: रुंद अँगलमध्ये ग्रुप फोटो घेण्यासाठी 8MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर दिला आहे. फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा असून, यातही ‘क्वाड पिक्सेल’ तंत्रज्ञान मिळते. हार्डवेअर आणि सेन्सर फीचर: अचूक एक्सपोजर आणि वेगवान ऑटोफोकससाठी यात 2-इन-1 एम्बियंट लाईट सेन्सर देण्यात आला आहे.
सॉफ्टवेअर आणि AI टूल्स
हा फोन गुगल फोटोजच्या एआय टूल्सशी थेट जोडलेला आहे, ज्यामुळे बहिणीला फोटो एडिट करणे अतिशय सोपे होईल. मॅजिक इरेझर: फोटोमधील नको असलेले लोक किंवा वस्तू एका क्लिकवर काढून टाकण्यासाठी. फोटो अनब्लर: हललेले किंवा अंधुक आलेले फोटो एकदम स्पष्ट करण्यासाठी. रीइमॅजिन: एआयच्या मदतीने फोटोचा बॅकग्राउंड बदलण्यासाठी. ऑटो फ्रेम आणि पोर्ट्रेट लाईट: चेहऱ्यावरील प्रकाश आणि फ्रेमिंग उत्तमरित्या अॅडजस्ट करण्यासाठी.
डिस्प्ले
- स्क्रीन: 6.7 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले (रेझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल्स)
- रिफ्रेश रेट: 120Hz रिफ्रेश रेट (स्मूथ स्क्रोलिंगसाठी)
- ब्राइटनेस: 1050 निट्स पीक ब्राइटनेस (उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल)
- सुरक्षा: कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन
परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर
- प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन 6एस जेन 4 4nm ऑक्टा-कोर प्रोसेसर
- रॅम: 6GB LPDDR5X रॅम
- स्टोरेज: 128GB UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेज
- ऑपरेटिंग सिस्टीम: अँड्रॉइड 16 – यात 2 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 3 वर्षांचे सुरक्षेचे (SMR) अपडेट्स मिळतील.
- सिम सपोर्ट: ड्युअल सिम (नॅनो + नॅनो)
कॅमेरा सेटअप
- मुख्य रिअर कॅमेरा: 50MP चा प्रायमरी कॅमेरा (Sony LYT-600 सेन्सर, f/1.8 अपर्चर, LED फ्लॅश आणि फ्लिकर डिटेक्टरसह)
- दुसरा रिअर कॅमेरा: 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा (118° अँगल आणि f/2.2 अपर्चर)
- रिअर व्हिडिओ: 1080p पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
- फ्रंट कॅमेरा (सेल्फी): 8MP चा फ्रंट कॅमेरा (f/2.2 अपर्चर, 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट)
बॅटरी आणि चार्जिंग
- बॅटरी क्षमता: 7०००mAh ची अवाढव्य बॅटरी (सहज 3 दिवस टिकणारी)
- चार्जिंग: 30W टर्बो फास्ट चार्जिंग (Turbo Charging) सपोर्ट
डिझाईन आणि सुरक्षा फीचर्स
- मजबुती: धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग आणि मिलिट्री-ग्रेड MIL-STD 810H प्रमाणपत्र.
- फिंगरप्रिंट सेन्सर: बाजूला असलेला (Side-mounted) फिंगरप्रिंट सेन्सर.
- ऑडिओ: 3.5mm ऑडिओ जॅक, डॉल्बी अॅटमॉस (Dolby Atmos) सपोर्ट असलेले स्टिरिओ स्पीकर्स आणि ड्युअल माईक.
- आकार आणि वजन: 166.23 x 76.50 x 8.60 मिमी; वजन: 210 ग्रॅम
किंमत आणि उपलब्धता
किंमत: मोटो जी मॅक्स (moto g max) हा फोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज या एकाच मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला असून, याची किंमत 27,999 निश्चित करण्यात आली आहे. विक्रीची तारीख: हा स्मार्टफोन 20 ऑगस्टपासून ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध होईल. कुठे खरेदी करता येईल? हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, मोटोरोलाचे अधिकृत संकेतस्थळ motorola.in आणि तुमच्या जवळच्या प्रमुख मोबाईल दुकानांमध्ये उपलब्ध असेल

