Headlines

Paper Shares To Demat Process ; आजोबांचे जुने पेपर शेअर्स नातवाला मिळणे शक्य! Demat खात्याशी जोडून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या


आजच्या काळात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात रक्कम गुंतवण्यासाठी Demat खाते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नाही. परंतु, आधीच्या काळात आतासारखे डिजिटल साधने नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदाराने एखादे शेअर्स विकत घेतले तर त्याचे प्रमाण म्हणून कंपनीकडून एक कागदी दस्तऐवज पुरवण्यात यायचे. या दस्तऐवजावर संपूर्ण व्यवहाराची माहिती नमूद असायची. कोणते शेअर्स? किती शेअर्स? गुंतवणूकदाराचे नाव काय? किंमती काय होत्या? तारीख काय होती? या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या दस्तऐवजावर नमूद असायच्या. एकंदरीत, हे दस्तऐवज म्हणजे गुंतवणूकदार आणि कंपनीमध्ये झालेल्या कराराचे कागदपत्र.

विशेष म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्या आजोबांचे किंवा आई-वडिलांचे जुने पेपर शेअर्स असतील तर तुम्ही त्या रक्कमेवर आताही अधिकार मिळवू शकता. त्या पेपर शेअर्सचा वारसाहक्क मिळवण्यासाठी मूळ गुंतवणूकदाराचे हयात असणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, जर पेपर शेअर्स आजोबांचे असतील आणि आजोबांचा मृत्यू झाला असेल तरीही तुम्ही त्या पेपर शेअर्सला तुमच्या Demat खात्याशी जोडू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे दस्तऐवज असणे बंधनकारक असणार आहे.

पेपर शेअर्सला Demat खात्याशी जोडण्यासाठी आवश्यक दस्तऐवज कोणते?

जर आजोबांचे कागदी शेअर्स तुमच्याकडे आहेत. तर ते तुमच्या Demat खात्याशी जोडून घेण्यासाठी काही महत्वाच्या दस्ताएवजांची गरज भासू लागते. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे वारसाहक्क सिद्ध करावे लागेल. सेबीच्या नियमांनुसार, मृत गुंतवणूकदाराचे शेअर्स वारसाहक्क म्हणून नॉमिनी तसेच कायदेशीर वारसाला मिळणे शक्य आहे पण त्यासाठी कायदेशीर वारसाहक्क सिद्ध करावा लागतो. त्यासाठी कंपनीच्या आरटीएकडे अर्ज करावे लागते. शेअरधारकांच्या नोंदी आणि शेअर हस्तांतरण करण्याचे सर्व कार्य आरटीएच्या नियंत्रणाखाली येते.

अर्ज करताना आवश्यक त्या दस्तऐवजांची पुष्टी करावी लागते. या दस्तऐवजांमध्ये आजोबांचे पेपर शेअर्स प्रमाणपत्र, आजोबांचा मृत्यूचा दाखला, अर्जकर्त्याचा पॅन कार्ड, केवायसी प्रूफ, ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म (वारसाने शेअर आपल्या नावे करण्यासाठी केलेल्या अर्ज) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अर्जकर्त्याला 1 एप्रिल 2019 पूर्वीच ट्रान्सफर deed ही सादर करावे लागते. त्याचसह अर्ज कर्त्याच्या Demat खात्यासंबंधित cml ही सादर करावे लागते. त्याच बरोबर आवश्यकतेनुसार इतर काही महत्वाच्या दस्तऐवजांची गरजही भासू शकते.

पुरवण्यात आलेल्या दस्तऐवजांची पडताळणी झाल्यावर पात्र अर्जदाराच्या Demat खात्याशी जुने कागदी शेअर्स जोडण्यात येते.

Maharashtra TimesTATA Leadership Feud: एन. ‘चंद्रा’च्या राजीनाम्यामुळे TATA समूहात मोठं वादळ, सत्तासंघर्ष तीव्र, नोएल टाटा निवडणार साम्राज्याचा पुढचा किंगमेकरअर्ज कर्त्याने लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी!

अनेकदा जर एखाद्या शेअर्सवर मोठ्या काळापासून कुणी दावा करत नसेल किंवा एखादा शेअर्स गेल्या अनेक काळापासून बेवारस दिसून येत असेल तर अशावेळी ते शेअर्स IEPF च्या नियंत्रणाखाली येते. IEPF कडे शेअर्स गेले तर ते पुन्हा मिळवणे कठीण होऊ शकतात. पेपर शेअर्स Demat खात्याशी जोडण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत, आधी एखाद्या योग्य व्यक्तीच्या नावावर शेअर्सची मालकी निश्चित करण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या Demat खात्याशी ते शेअर्स जोडले जातात, त्यानंतरच त्या व्यक्तीला त्या शेअर्ससंबंधित व्यवहार करण्याचे अधिकार मिळतात.

दिवेश दिनेश

लेखकाबद्दलदिवेश दिनेशदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत