Headlines

Master Ravi : ‘तो चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा’, बालपणी सेक्रेटरीकडून शारीरिक शोषण, मास्टर रवी यांचा खुलासा


Master Ravi : अभिनेते मास्टर रवी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेल्या भयानक प्रकाराबद्दल सांगितलं आहे.

Master Ravi On Childhood Physical Harassment
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून मोठी ओळख निर्माण करणारे रवी वलेचा म्हणजेच ‘मास्टर राजू’ यांनी त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव नुकताच सांगितला आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीत लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. मात्र, त्या काळात कोणाला काही सांगण्याची हिंमत झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.

बालपणी केला लैंगिक शोषणाचा सामना

रवी वलेचा यांनी बालकलाकार म्हणून तब्बल ३०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या असून, अनेक चित्रपटांमध्ये ते अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जात होते. ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुली’, ‘फकीरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटात एका सिनसाठी मृणाल कुलकर्णीला का करावा लागला हट्ट ?

रवी यांनी सांगितलं की, ते साधारण आठ वर्षांचे असताना त्यांच्यासोबत पहिली घटना घडली. त्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करत असताना त्यांना एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक गैरवर्तनाचा सामना करावा लागला. एका घटनेची आठवण सांगताना त्यांनी डबिंग थिएटरमधील प्रसंग सांगितला. एका मोठ्या व्यक्तीनं त्यांना मांडीवर बसण्यास सांगितलं. त्या वेळी नेमकं काय घडत आहे, हे समजण्याइतकेही ते मोठे नव्हते. मात्र, त्या अनुभवामुळे त्यांना भीती वाटली.

Maharashtra TimesRajiv Kapoor : ‘कपूर’ घराण्यातील अभिनेता, अपयशाचं खापर वडिलांवर फोडलं, लग्नाच्या 2 वर्षात काडीमोड अन् दारूच्या आहारी; वयाच्या 58व्या वर्षी मृत्यू
यानंतर त्यांच्यासोबत आणखी गंभीर प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितले. शूटिंगसाठी त्यांच्यासोबत राहण्यासाठी एका तरुण सेक्रेटरीची नियुक्ती करण्यात आली होती. प्रवासादरम्यान आणि कारमध्ये त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केला जायचा. रवी यांनी सांगितलं की, त्या काळात त्यांच्यासोबत जे काही घडत होतं, ते कोणाला सांगावं हेच त्यांना समजत नव्हतं. विशेषतः शूटिंगसाठी दररोज त्याच व्यक्तीसोबत जावं लागायचं आणि तो चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा, त्यामुळे जास्त भीती वाटायची.

Maharashtra TimesKriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर
एका आउटडोअर शुटिंगदरम्यान त्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत नसताना त्याच व्यक्तीसोबत खोली शेअर करण्याची वेळ आली. त्यावेळी रात्री घडलेल्या एका घटनेनं मास्टर रवी यांना हादरवून सोडलं. मात्र, भीतीमुळे त्यांनी त्याबाबत कोणालाही काही सांगितलं नाही. ‘माझ्याशी कोण बोलणार? कोण माझ्यावर विश्वास ठेवणार?’ असा विचार करून ते अनेक वर्षे गप्प राहिले. त्या काळात लैंगिक शोषणाबाबत उघडपणे बोलण्याची परिस्थितीही नव्हती, असं मास्टर रवी यांनी सांगितलं.

Maharashtra TimesRenuka Daftardar : ‘शास्त्र असतं ते…’ फेम रेणुका दफ्तरदार पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर, हास्यजत्रा फेम अभिनेताही सोबतीला, प्रेक्षक उत्सुक
बालपणीचे हे अनुभव रवी यांच्या मनातून कधीच पूर्णपणे गेले नाहीत. अनेक वर्षे त्यांनी या आठवणी मनात दडवून ठेवल्या. त्याचा परिणाम पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. रवी यांनी सांगितलं की, मनात दडवून ठेवलेल्या वेदनेचं रूपांतर हळूहळू रागात झालं. त्यांना स्वतःच्या रागाचं मूळ कारणही अनेक वर्षे समजलं नाही. या अनुभवांवर मात करण्यासाठी जवळपास दीड वर्षापूर्वी रवी यांनी थेरपी घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही आठवड्यांत त्यांना या विषयावर बोलताही येत नव्हतं. मात्र, थेरपिस्टच्या मदतीनं त्यांनी हळूहळू मनात दडवून ठेवलेल्या आठवणींना सामोरं जाण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांच्या थेरपीनंतर त्यांच्या मानसिक स्थितीत मोठा बदल झाला. या घटनांचा परिणाम रवी यांच्या आयुष्यात आजही काही प्रमाणात कायम आहे. डबिंग थिएटरमधील अनुभवामुळे ते आजही एकटे चित्रपटगृहात जाणं टाळतात, असं त्यांनी सांगितलं. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मास्टर रवी बोलत होते.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा