Master Ravi : अभिनेते मास्टर रवी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेल्या भयानक प्रकाराबद्दल सांगितलं आहे.

बालपणी केला लैंगिक शोषणाचा सामना
रवी वलेचा यांनी बालकलाकार म्हणून तब्बल ३०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या असून, अनेक चित्रपटांमध्ये ते अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जात होते. ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुली’, ‘फकीरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटात एका सिनसाठी मृणाल कुलकर्णीला का करावा लागला हट्ट ?
रवी यांनी सांगितलं की, ते साधारण आठ वर्षांचे असताना त्यांच्यासोबत पहिली घटना घडली. त्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करत असताना त्यांना एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक गैरवर्तनाचा सामना करावा लागला. एका घटनेची आठवण सांगताना त्यांनी डबिंग थिएटरमधील प्रसंग सांगितला. एका मोठ्या व्यक्तीनं त्यांना मांडीवर बसण्यास सांगितलं. त्या वेळी नेमकं काय घडत आहे, हे समजण्याइतकेही ते मोठे नव्हते. मात्र, त्या अनुभवामुळे त्यांना भीती वाटली.
Rajiv Kapoor : ‘कपूर’ घराण्यातील अभिनेता, अपयशाचं खापर वडिलांवर फोडलं, लग्नाच्या 2 वर्षात काडीमोड अन् दारूच्या आहारी; वयाच्या 58व्या वर्षी मृत्यू
यानंतर त्यांच्यासोबत आणखी गंभीर प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितले. शूटिंगसाठी त्यांच्यासोबत राहण्यासाठी एका तरुण सेक्रेटरीची नियुक्ती करण्यात आली होती. प्रवासादरम्यान आणि कारमध्ये त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केला जायचा. रवी यांनी सांगितलं की, त्या काळात त्यांच्यासोबत जे काही घडत होतं, ते कोणाला सांगावं हेच त्यांना समजत नव्हतं. विशेषतः शूटिंगसाठी दररोज त्याच व्यक्तीसोबत जावं लागायचं आणि तो चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा, त्यामुळे जास्त भीती वाटायची.
Kriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर
एका आउटडोअर शुटिंगदरम्यान त्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत नसताना त्याच व्यक्तीसोबत खोली शेअर करण्याची वेळ आली. त्यावेळी रात्री घडलेल्या एका घटनेनं मास्टर रवी यांना हादरवून सोडलं. मात्र, भीतीमुळे त्यांनी त्याबाबत कोणालाही काही सांगितलं नाही. ‘माझ्याशी कोण बोलणार? कोण माझ्यावर विश्वास ठेवणार?’ असा विचार करून ते अनेक वर्षे गप्प राहिले. त्या काळात लैंगिक शोषणाबाबत उघडपणे बोलण्याची परिस्थितीही नव्हती, असं मास्टर रवी यांनी सांगितलं.
Renuka Daftardar : ‘शास्त्र असतं ते…’ फेम रेणुका दफ्तरदार पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर, हास्यजत्रा फेम अभिनेताही सोबतीला, प्रेक्षक उत्सुक
बालपणीचे हे अनुभव रवी यांच्या मनातून कधीच पूर्णपणे गेले नाहीत. अनेक वर्षे त्यांनी या आठवणी मनात दडवून ठेवल्या. त्याचा परिणाम पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. रवी यांनी सांगितलं की, मनात दडवून ठेवलेल्या वेदनेचं रूपांतर हळूहळू रागात झालं. त्यांना स्वतःच्या रागाचं मूळ कारणही अनेक वर्षे समजलं नाही. या अनुभवांवर मात करण्यासाठी जवळपास दीड वर्षापूर्वी रवी यांनी थेरपी घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही आठवड्यांत त्यांना या विषयावर बोलताही येत नव्हतं. मात्र, थेरपिस्टच्या मदतीनं त्यांनी हळूहळू मनात दडवून ठेवलेल्या आठवणींना सामोरं जाण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांच्या थेरपीनंतर त्यांच्या मानसिक स्थितीत मोठा बदल झाला. या घटनांचा परिणाम रवी यांच्या आयुष्यात आजही काही प्रमाणात कायम आहे. डबिंग थिएटरमधील अनुभवामुळे ते आजही एकटे चित्रपटगृहात जाणं टाळतात, असं त्यांनी सांगितलं. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मास्टर रवी बोलत होते.

