Suneel Darshan On Akshay Kumar Affair : निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा होते. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा ही जोडीही एकेकाळी अशाच चर्चेचा विषय ठरली होती. दोघांनी ‘अंदाज’ आणि ‘ऐतराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं. मात्र, त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध अफवा पसरू लागल्या. या चर्चेचा परिणाम अक्षयच्या वैवाहिक आयुष्यावरही झाल्याचा दावा निर्माते सुनील दर्शन यांनी केला आहे.
सुनील दर्शन यांच्या ‘बरसात’ या चित्रपटात सुरुवातीला अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचं शूटिंगही सुरू झालेलं आणि दोघांनी एक गाणंदेखील शूट केलं होतं. मात्र, अचानक अक्षयनं या प्रोजेक्टमधून माघार घेतली. त्यानंतर त्याच्या जागी बॉबी देओलला घेण्यात आलं आणि २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’मध्ये बॉबी देओल, प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बासू मुख्य भूमिकेत दिसले.
सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘जेव्हा आम्हाला पुन्हा शूटिंग सुरू करायचं होतं, तेव्हा काही अडचणी निर्माण झाल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या अडचणींना वाढवून सांगितलं जात होतं आणि अखेर आम्हाला जाणवलं की, अक्षय आणि प्रियांका हे दोघं एकत्र या चित्रपटात काम करू शकत नाहीत.’
प्रियदर्शिनी इंदलकरमुळे दिग्दर्शक – अभिनेत्याला काही महिने का थांबावं लागलं ?
‘त्यांनी आता एकत्र काम केलं असतं, तर त्याच्या कुटुंबात त्याचे परिणाम झाले असते. या संपूर्ण प्रकरणामुळे मी खूप नाराज झालो होतो. माझ्या मते, तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्यावर एक जबाबदारी असते. तुम्ही बेजबाबदारपणे वागू शकत नाही. पण आम्ही याबाबत काय करू शकत होतो? अक्षयने चित्रपट पुढे ढकलण्याची विनंती केल्यावर आपल्याला धक्का बसला. मात्र, आमच्यासाठी चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलणं शक्य नव्हतं, कारण जवळपास १०० जणांची टीम शूटिंगसाठी तयार होती. मला असं वाटतं की, विवाहित पुरुषानं अधिक जबाबदारीनं वागायला हवं. प्रियांका विवाहित नव्हती. त्यामुळे जर मला निवड करायचीच असेल, तर प्रियांकानं या चित्रपटात काम करावं, असा निर्णय मी घेतला.’ असं सुनील दर्शन यांनी पुढे सांगितलं. ‘मिनिट्स ऑफ मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन बोलत होते.
Kriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर तसेच ‘फ्रायडे टॉकीज’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सुनील दर्शन यांनी प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांचं अफेअर असल्याचं सांगितलेलं. सुनील दर्शन म्हणाले होते की, ‘प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्याबद्दल काही अफवा पसरलेल्या आणि ट्विंकलनं त्याचं घर सोडलं. एक अभिनेता म्हणून तुम्ही जबाबदार असलं पाहिजे. तुमची पत्नी जर अभिनेत्री असेल, तर तिला इंडस्ट्रीबद्दल सगळं माहिती असतं. तिनेही मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे तिला सगळ्या गोष्टींची माहिती होती.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा