शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या ५८ लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी तातडीने करावी, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, सातारा, कोल्हापूर, औंध, बाॅम्बे गॅझेटचा शासन निर्णय काढण्यात यावा या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
‘मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जात वैधता प्रमाणपत्र समिती सोबत बैठक लावण्याची सूचना केली होती. या सर्वांना बोलून काय अडचणी आहेत ते प्रत्यक्षात विचारावे, असे सुचविले होते . विखे पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण काही उपयोग नाही. त्यांना काहीच कळत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत,’ असा आरोप जरांगे यांनी केला.
Jalna News: जालन्यात वाळूमाफियांचा धुडगूस! अंगावर हायवा घालून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न, महसूल सेवक जखमी‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत. आमदार प्रसाद लाड खूप मेहनत घेत आहेत, पण काही उपयोग होत नाही,’ असे जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलनाची सुरुवात अंतरवाली सराटीतच होणार आहे, पण मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे करू. मुंबईत आझाद मैदानावर नाही, तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर आंदोलन उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतरवाली सराटीत मोठा मंडप उभारण्यात आला आहे.
वडेट्टीवार मराठा-ओबीसी वाद पेटवतायत, हकालपट्टी केली नाही तर काँग्रेसला संपवू, महेश डोंगरेंचा इशारा
जात पडताळणीसाठी आंदोलन
वैजापूर : कुणबी जात प्रमाणपत्राची कायदेशीर वैधता ( व्हॅलिडिटी ) देण्यास संबंधित विभागाकडून आठ महिने उलटून गेले तरी विलंब होत असल्याने विद्याथ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या पालकांनी शुक्रवारी शास्त्रीनगर भागातील जळकुंभावर चढून आंदोलन केले. प्रशासनाने समजूत काढून, याबाबत लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
मंत्री विखे पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण काही उपयोग नाही. त्यांना काहीच कळत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत. -मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलक

