Headlines

Manoj Jarange: मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; आंतरवाली सराटीत आजपासून आंदोलनास सुरुवात – manoj patil jarange set to begin hunger strike at antarwali sarati today 29 august 2026


म. टा. प्रतिनिधी, जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे आज, शनिवारपासून (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या ५८ लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी तातडीने करावी, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, सातारा, कोल्हापूर, औंध, बाॅम्बे गॅझेटचा शासन निर्णय काढण्यात यावा या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.

‘मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जात वैधता प्रमाणपत्र समिती सोबत बैठक लावण्याची सूचना केली होती. या सर्वांना बोलून काय अडचणी आहेत ते प्रत्यक्षात विचारावे, असे सुचविले होते . विखे पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण काही उपयोग नाही. त्यांना काहीच कळत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत,’ असा आरोप जरांगे यांनी केला.

Maharashtra TimesJalna News: जालन्यात वाळूमाफियांचा धुडगूस! अंगावर हायवा घालून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न, महसूल सेवक जखमी‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत. आमदार प्रसाद लाड खूप मेहनत घेत आहेत, पण काही उपयोग होत नाही,’ असे जरांगे पाटील म्हणाले.

आंदोलनाची सुरुवात अंतरवाली सराटीतच होणार आहे, पण मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे करू. मुंबईत आझाद मैदानावर नाही, तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर आंदोलन उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतरवाली सराटीत मोठा मंडप उभारण्यात आला आहे.

वडेट्टीवार मराठा-ओबीसी वाद पेटवतायत, हकालपट्टी केली नाही तर काँग्रेसला संपवू, महेश डोंगरेंचा इशारा

जात पडताळणीसाठी आंदोलन

वैजापूर : कुणबी जात प्रमाणपत्राची कायदेशीर वैधता ( व्हॅलिडिटी ) देण्यास संबंधित विभागाकडून आठ महिने उलटून गेले तरी विलंब होत असल्याने विद्याथ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या पालकांनी शुक्रवारी शास्त्रीनगर भागातील जळकुंभावर चढून आंदोलन केले. प्रशासनाने समजूत काढून, याबाबत लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

मंत्री विखे पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण काही उपयोग नाही. त्यांना काहीच कळत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान करीत आहेत. -मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत