Headlines

Maharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक


Shardul Thakur : क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं कौतुक केलं असून समीर चौघुले यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे.

Shardul Thakur On Maharashtrachi Hasyajatra
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना कार्डिफच्या मैदानावर पार पडला. या सामन्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांनी हजेरी लावलेली. अशातच आता क्रिकेटर शार्दुल ठाकूरनेही महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचं कौतुक केलं आहे. तसंच समीर चौघुले यांचंही त्यांनी कौतुक केलंय.

अरुण कदम आणि प्रभाकर मोरे यांची डायलॉग न विसरण्याची ट्रिक, ऐकून तुम्ही ही पोट धरून हसाल

भारत आणि इंग्लंडच्या सामन्यादरम्यान समीर चौघुले आणि ओंकार राऊत यांना, ‘तुमच्या कार्यक्रमाचे इतके चाहते आहेत तर तुमच्या अंदाजात टीम इंडियासाठी काय मॅसेज देणार?’ असं विचारलं असता समीर चौघुले म्हणाले की, ‘नमस्कार महाराष्ट्रातील आणि जगभरातील सगळ्या मराठी लोकांना आणि भारतीयांना माझा आणि ओमकारचा नमस्कार. कार्डिफमध्ये आलेलो आहोत, इंग्लंडची आणि भारताची मॅच पाहण्यासाठी. खूप मजा येत आहे. एवढंच सांगायचं आहे की, रसिकहो हमारे लिये क्या हे…’ पुढे ओंकार राऊत म्हणाला की, ‘नमस्कार मी मनोमिलन स्वरछेडे आज इथे…’ ओंकार पुढे काही बोलताच समीर चौघुले त्याला थांबवतात. पुढे, समीर आणि ओंकार शार्दुल ठाकूरसोबत संवाद साधतात.
समीर म्हणतात, ‘आपल्यासोबत आहे सगळ्यांचा आवडता शार्दुल ठाकूर मॅजिकल गोलंदाज. शार्दुल ठाकूर तुम्हाला मनापासून खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. मला माहीत आहे तुम्ही आमचं बोलणं ऐकत आहात.’ पुढे ओंकार विचारतो, ‘शार्दुलजी मला खरंच कळत नाही, तुम्ही आल्या आल्या विकेट कशी घेता पहिल्या ओव्हरमध्ये? दरवेळी तुम्ही विकेट कशी घेता? त्यानंतर ओंकार आणि समीर यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

शार्दुल ठाकूरनं केलं कौतुक

सोनी लिव्हनं सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरचाही व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये शार्दुल म्हणतोय, ‘समीर सर…तुम्ही खूप ज्येष्ठ अभिनेते आहात. आम्ही नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघतो, तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. देवानं माझ्यावर चांगली कृपा केलीये की, जेव्हाही मी गोलंदाजी करायला येतो…तेव्हा एक-दोन विकेट काढतोच लोकांना त्यातून आनंद मिळतो. जसा आनंद तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकांना देता तसंच मीसुद्धा माझ्या कामातून ते करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा मेसेज ऐकून खूप छान वाटलं त्यासाठी धन्यवाद.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा