Headlines

Maharashtrachi Hasyajatra फेम ओंकार राऊतची मोठ्या पडद्यावर वर्णी, कोकणातील गूढकथेवर आधारित मराठी सिनेमा; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला


महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊत रंगभूमी, छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. लवकरच तो ‘संडे १९९६’ या सिनेमात दिसणार आहे.

Onkar Raut upcoming Movie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन कथांमधून प्रेक्षकांना नवे विषय आणि वेगळे अनुभव दिले आहेत. याच समृद्ध परंपरेत एका अनोख्या आणि उत्कंठावर्धक विषयासह ‘ संडे १९९६ ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ‘संडे १९९६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाच्या निमित्ताने भरत गोगावले यांनी ‘संडे १९९६’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणारी ही कथा रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाभोवती फिरते. व्ही.आर.के फिल्मस निर्मित ‘संडे १९९६’ चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांनी केलं आहे.

कलाकार कोण कोण?

या चित्रपटात ओंकार राऊतसह गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Maharashtra TimesShubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी सांगितलं की, ‘‘संडे १९९६’च्या माध्यमातून आम्ही केवळ रहस्यकथा सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर काळ, नाती आणि त्याच्याशी संबंधित माणसाच्या आयुष्यातला भूतकाळ याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

दिग्दर्शक जीवन चव्हाण सांगतात, ‘संडे १९९६’ची कथा मांडताना आमच्यासमोर सर्वातमोठं आव्हान होतं ते म्हणजे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवतानाच त्यामागच्या भावनिक नात्यांनाही योग्य न्याय देणं.‘प्रेक्षकांनी केवळ कथा अनुभवू नये तर सोबत त्या कथेतील प्रत्येक क्षणाची अनुभूती घ्यावी अशी आमची इच्छा आहे.

Maharashtra TimesMumbai News: मायानगरीचा मोह! ‘तारक मेहता’ शोमध्ये काम करण्यासाठी मुलाने सोडलं घर, थेट गाठली मुंबई
या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे या कथेला असलेली निसर्गरम्य कोकणाची पार्श्वभूमी. कोकणाचा निसर्ग जितका सुंदर आणि मनमोहक आहे, तितकाच तो आपल्या कुशीत अनेक रहस्ये आणि गूढ कथा दडवून ठेवतो. याच निसर्गरम्य आणि गूढ वातावरणाचा प्रभावी वापर ‘संडे १९९६’मध्ये करण्यात आला आहे. काळाची चक्रे जेव्हा उलटी फिरतात, तेव्हा वर्तमानात जगणाऱ्या माणसाचं आयुष्यही बदलून जातं, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘संडे १९९६’ प्रेक्षकांना अनोखा, थरारक सिनेमॅटिक अनुभव द्यायला सज्ज झाला आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा