![]()
अजिंठा लेणी परिसरातील टी-पॉइंट भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी एका अस्वलाचा वावर वाढला आहे. या वन्यप्राण्याच्या मुक्त संचारामुळे येथे मुक्कामी थांबणारे पर्यटक आणि रात्रपाळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. अजिंठा राखीव जंगलात बिबटे, तरस, लांडगे, कोल्हे आणि अस्वले यांसारखे अनेक हिंस्त्र वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी बऱ्याचदा जंगलाबाहेर पडतात. यातच एक अस्वलाने गेल्या काही दिवसांपासून टी-पॉइंट परिसराला आपले ठिकाण बनवले आहे. टी-पॉइंट भागात पर्यटकांच्या मुक्कामासाठी गेस्ट हाऊस असून, तेथे रात्रीच्या वेळी पर्यटक हिरवळीवर तसेच बाहेर फिरण्यासाठी पडतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे अस्वलाने टी-पॉइंटवरून लेणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील एका लिंबाच्या झाडावर ठिय्या मांडला होता. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहून हाकलण्याचा प्रयत्न केला. वन विभागाने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा रात्रीच्या वेळी बेसावध असणाऱ्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांवर हे अस्वलाने हल्ला केल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे कोणताही अघटित प्रकार घडण्यापूर्वी वन विभागाने या अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यटक, स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
Source link
अजिंठा लेणी टी-पॉइंट परिसरात रात्रीच्या वेळी अस्वलाचा वावर; नागरिकांत भीती:वन विभागाने लक्ष देण्याची मागणी, वन्य प्राण्यांच्या संचारामुळे जिवाला धोका
