Paresh Rawal Post : सध्या तुकाराम मुंढे यांनी आपल्या बेधडक कारवाईने हॉटेल व्यावसायिक तसेच औषध तयार करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच परेश रावल यांनी त्यांंच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तुकाराम मुंढे हे नाव सतत चर्चेत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेले काही दिवस वेगवेगळ्या हॉटेल, औषध केंद्र तसेच कॅन्टीन यांसारख्या ठिकाणी धाड टाकून आरोग्याशी हेळसांड करणाऱ्या गोष्टींवर बेधडक कारवाई करत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ शिजवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवणारे हॉटेल, औषध विक्री केंद्र, डेअरी यांसारख्या ठिकाणांच्या मालकांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक हॉटेल व इतर दुकानांना तसेच कॅन्टीनला सुद्धा टाळेबंदी केली.
तुकाराम मुंढे यांच्या करियरचा इतिहास पाहता त्यांच्या आतापर्यंत बऱ्याच बदल्या करण्यात आले आहे. अन्यायाविरुद्ध न झुकता किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते बेधडक कारवाई करतात त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होतात असे म्हटले जाते. पण सध्या महाराष्ट्रात ते ज्या प्रकारे झपाट्याने काम करत आहेत त्यावरून सगळीकडून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतलाय.
Amit Rai Chhatrapati Shivaji Maharaj Film : इतिहास ब्रिटिशांनी लिहिला असता तर वेगळा असता! बॉलिवूड दिग्दर्शक ऐतिहासिक नोंदींच्या आधारे करणार छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा अशातच आता ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत तुकाराम मुंढे यांच्या बाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, अतिशय विनम्रतेने आणि आदराने मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करायची आहे की त्यांनी तुकाराम मुंढे यांचे संरक्षण द्या जेणेकरून त्यांची या विभागातून बदली होणार नाही किंवा त्यांना इथून हटवले जाणार नाही. त्यांच्या या पोस्टला अनेक सोशल मीडिया युजर्सनी सहमती दर्शवली आहे. तसेच तुकाराम मुंढे करत असलेल्या कामाचेही कौतुक केले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी त्यांची मे 2026 मधील नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे सूत्र हातात घेतली आणि अन्नपदार्थ किंवा औषधात भेसळ करणाऱ्या कंपन्या, हॉटेल, टपरी यांवर कठोर कारवाई सुरू केली. आतापर्यंत त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करून कोट्यवधी रुपयांचा निकृष्ट अन्नसाठा, भेसळयुक्त दूध, पनीर आणि बेकायदेशीर गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्येही धाड टाकत तिथे सुद्धा स्वच्छता नियमांचे उल्लंघन झाल्याचे दर्शवून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली. शाळांबाबतही त्यांनी नवीन नियम सुरू केले ज्यामध्ये शाळेच्या परिसरात 50 मीटर पर्यंत हाय फॅट, हाय शुगर असलेल्या जंक फूड पदार्थांच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर बंदी घातली आहे. तुकाराम मुंढे हे खरे सिंघम असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा