Headlines

Shahana Goswami : 21 वर्षांनी मोठ्या मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती लोकप्रिय अभिनेत्री; सांगितलं ब्रेकअपचं कारण, काय म्हणाली?


Shahana Goswami On Milind Soman : लोकप्रिय अभिनेत्री शहाना गोस्वामी मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शहानानं ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.

Shahana Goswami On Milind Soman
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री शहाना गोस्वामीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील महत्वपूर्ण खुलासा केला आहे. शहाना २१ वर्षांनी मोठ्या मिलिंद सोमण यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. शहाना आणि मिलिंद सोमण जवळपास दीड ते दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि २०१३ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. अभिनेत्रीनं मुलाखतीमध्ये ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.

शहानानं मिलिंद सोमणसोबत ब्रेकअप का केला?

शहाना गोस्वामीनं प्रियांका भट्टच्या ‘ब्रेकथ्रू मोमेंट्स विथ प्रियांका भट्ट’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल सांगितलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिचे अनेक रिलेशनशिप होते, मात्र या नात्यांमध्ये तिला खूप त्रास झालेला. शहाना म्हणाली की, त्या क्षणी तिला जाणवलं की जोपर्यंत ती स्वतःवर प्रेम करायला शिकत नाही, तोपर्यंत तिला कोणत्याही नात्यात प्रेमाची भावना अनुभवता येणार नाही. समोरची व्यक्ती तिच्यावर कितीही प्रेम करो किंवा तिच्यासाठी काहीही करो, जर तिला स्वतःबद्दल चांगलं वाटत नसेल, तर ती ते प्रेम पूर्णपणे स्वीकारू शकणार नाही.

Maharashtra TimesMehmood Son Lucky Ali : मेहमूद यांचा मुलगा, मीना कुमारींचा भाचा, ३ लग्न अन् घटस्फोट, नाही मिळालं खरं प्रेम; स्वतःच्या गाण्यानं चाहत्यांना लावतोय वेड
ही जाणीव शहानाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. शहाना म्हणाली की, ‘आम्ही साधारण दीड ते दोन वर्षं एकत्र होतो. लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात अनेक लोक आले. मात्र, प्रत्येक रिलेशनशिपनंतर मला खूप त्रास सहन करावा लागला. त्या काळात मला एक गोष्ट जाणवली की, जोपर्यंत मला स्वतःवर प्रेम करायला शिकता येणार नाही, तोपर्यंत कोणत्याही नात्यातून मला प्रेम मिळणार नाही.’

Maharashtra TimesKangana Ranaut : ‘नसीरुद्दीन शाह याच देशात राहतात, पण शेजारच्या देशासाठी लढतात’, कंगनाची अभिनेत्यावर टीका; काय घडलं?
‘समोरची व्यक्ती तिच्या दृष्टीनं माझ्यासाठी कितीही काही करत असली, तरी ते प्रेम मी स्वीकारू शकणार नाही. मला सतत असं वाटत राहील की, माझं परीक्षण केलं जातंय, मी कमी पडत आहे आणि मला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे मलाच त्रास होईल. त्याच काळात मला ही जाणीव झाली आणि मी माझ्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला. मी त्याला सांगितलं की, मला जाणवतंय की, ही माझीच अडचण आहे आणि जोपर्यंत मला हे समजून घेता येत नाही, तोपर्यंत मी कोणत्याच नात्यात आनंदी नसेन. त्यामुळे मला स्वतःबरोबर वेळ घालवायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करायचं आहे, त्यासाठी स्वतःवर काम करायचं आहे.’ असं शहाना पुढे म्हणाली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा