Headlines

Maharashtra Weather Update Meteorological Department Predicts Above Average Rainfall Next Four Weeks; महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण, हवामान विभागाचा ताजा अंदाज


Maharashtra Latest Weather Update : महाराष्ट्रात पावसाचे असमान वितरण असून पुन्हा मान्सूनचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी शेतकऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारा अलर्ट दिला आहे.

Maharashtra Latest Weather Update
आजचं हवामान अपडेट महाराष्ट्र टाइम्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्याच्या उत्तरार्धापासून एल निनोची तीव्रता अधिक जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचे पूर्वानुमान जारी केले असून यानुसार राज्यात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिकांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो, याकडे हवामान अभ्यासक लक्ष वेधत आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच पावसाची तूट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच पावसाची तूट आहे. या दोन आठवड्यांच्या अंदाजाबद्दल अधिक खात्री व्यक्त करताना त्यानंतरच्या दोन आठवड्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या पक्व अवस्थेत असलेल्या खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी दिलासादायक बातमी! POP मूर्तींचा विसर्जन संभ्रम तूर्तास दूर, उच्च न्यायालयाचं महत्त्वाचा निर्णय; फक्त एक अट

पिकांच्या अंतिम वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम

पावसाचा खंड वाढल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांच्या अंतिम वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारख्या पिकांसाठी पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरू शकतील. आधी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या भागात त्याचा परिणाम तुलनेने कमी असू शकतो. मात्र, पावसाचा खंड दीर्घकाळ वाढल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

पावसामध्ये खंड पडल्यास तापमानाचा पारा चढा

पावसाबरोबरच तापमानाची स्थितीही महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असू शकेल. मात्र त्यानंतर पावसामध्ये खंड पडल्यास तापमानाचा पारा चढा राहू शकतो. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे कमाल तापमानाचा पारा चढू शकतो. त्यानंतरच्या आठवड्यात १७ सप्टेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक नोंदले जाईल अशी शक्यता आहे.

Maharashtra TimesGovernment Action : कर्तव्यात कसूर महागात, गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक निलंबित
कमी पाऊस आणि अधिक तापमान अशी परिस्थिती निर्माण झाल्यास बाष्पीभवन वाढून जमिनीतील आर्द्रता वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे पिकांवरील पाण्याचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा