![]()
Satara Crime : 3 टक्के कमिशनचे आमिष अन् लोकांचे ATM आणि DEBIT कार्ड घ्यायचे, सायबर गुन्हेगारांसाठी काम करणारी टोळी सापडली
नागरिकांना 3 टक्के कमिशनचे आमिष दाखवत ATM/DEBIT कार्ड्स आणि SIM कार्ड्स गोळा करून त्यांच्या बँक खात्यांचा फसवणुकीची रक्कम जमा आणि हस्तांतरित (Layering) करण्यासाठी सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देणाऱ्या टोळीच्या सातारा सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सलमान मुनीर शेख, अफताब फिरोज पठाण, आदित्य शिवाजी मोने आणि अनिकेत अतुल कदम (सर्व रा. कोरेगाव, जि. सातारा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयितांनी वापरलेल्या म्युल अकाउंट विरोधात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासारख्या विविध राज्यांमधून 35 पेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद आहेत.
