Headlines

Rickshaw-Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! 1 सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार, किमान भाडे किती वाढले? – mumbai auto rickshaw and taxi fare hike from 1 september 2026 check here hew rates


Rickshaw-Taxi Fare Hike: मुंबईकरांनो, १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. आता किती रुपये द्यावे लागणार? नवे दर तपासा…

Anderson Phillip Catch - 2026-08-22T102842
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक भाडे मोजावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपया, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही भाडेवाढ १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

सध्या मुंबई महानगर प्रदेशात रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आहे. नव्या दरानुसार ते २७ रुपये होणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पनवेल या महामुंबईतील भागांमध्ये ही दरवाढ लागू होणार आहे.

Maharashtra TimesRahul Gandhi Pune: राहुल गांधींचा आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थाइंधन दरवाढ, वाहनांचे सुटे भाग, वाहन विमा, परवाना शुल्क तसेच वाहन देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे रिक्षा-टॅक्सी संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे पाठवला होता. भाडेवाढीचा अधिकार ‘एमएमआरटीए’कडे असल्याने प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करून या दरवाढीस मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, या निर्णयामुळे महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सामान्य प्रवाशांच्या रोजच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. भाडेवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रवाशांचा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Maharashtra Times2014 मध्येच मविआ सरकार येणार होतं? पृथ्वीराज बाबांचा गौप्यस्फोट; फडणवीस अन् 175 नेत्यांचा दाखलाशेअर भाड्याचे काय?

मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ‘एमएमआर’मधील शेअर रिक्षा-टॅक्सी भाड्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेअर भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहन —सध्याचे किमान भाडे —१ सप्टेंबरपासून

रिक्षा —२६ रुपये —२७ रुपये

काळी-पिवळी टॅक्सी —३१ रुपये —३३ रुपये

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा