मुंबई- पुण्यानंतर औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून नाशिककडे पाहिले जात असताना ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे. नाशिकच्या तुलनेत पुण्यात तब्बल ६,४३३, ठाण्यात ४,७०४, मुंबई शहरात १२,००९, नागपुरात १,४७८, रायगडमध्ये ८२२ आणि संभाजीनगरमध्ये ६५४ कंपन्यांचा समावेश आहे.
खासदार वाजे यांनी कंपन्या बंद होण्याबरोबरच विस्थापित कामगारांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही उपस्थित केला. मात्र, कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार बेरोजगार झाले, किती कामगारांची भविष्यनिर्वाह निधी, उपदान किंवा थकीत वेतनाची देणी प्रलंबित आहेत, याची एकत्रित माहिती केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्तकिती कामगारांना फटका?
कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत गेल्यास कामगारांचे दावे संबंधित कायदेशीर प्रक्रियेत हाताळले जातात, असे केंद्राने सांगितले. मात्र, महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्यांच्या बंद होण्याचा प्रत्यक्ष फटका किती कामगारांना आणि कुटुंबांना बसला, याचा अधिकृत एकत्रित आकडा कामगार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत’ या दाव्यासोबतच राज्यातून किती उद्योग बाहेर पडत आहेत किंवा बंद होत आहेत, याचाही हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल ८४० कंपन्या बंद झाल्याची बाब पुढे आल्याने जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रगतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उद्योगमंत्र्यांचे सततचे दौरे व घोषणा, गुंतवणूक परिषदांचा झगमगाट, नव्या गुंतवणुकीचे हजारो कोटींचे आकडे यामुळे जिल्ह्यात नव्या उद्योगांची जणू रांग लागली असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच बुधवारी (दि. १२) समोर आलेल्या आकडेवारीने जणू हा फुगा फोडला आहे.
Ashram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थितीजिल्हानिहाय बंद/वगळलेल्या कंपन्या
मुंबई शहर : १२,००९
पुणे : ६,४३३
ठाणे : ४,७०४
नागपूर : १,४७८
नाशिक : ८४०
रायगड : ८२२
छत्रपती संभाजीनगर : ६५४
अहमदनगर : ३०८
सातारा : १९६
जळगाव : २१५
एकूण : ३६,२११
राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नाही. एक दिवस द्या, मी तपासून सांगतो. – उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र

