Headlines

LPG Cylinder Price | जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा! व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात


दिल्ली – हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट देण्यात आले…तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 183.50 रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. हा व्यावसायिक दारांसाठी मोठा दिलासा मानला जातो..गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली…

इराण – इस्रायल युध्दाचे थेट परिणाम एलपीजी सिलिंडरवर पडल्याचे दिसुन येत होते..इराण आणि अमेरिका युद्ध 3 महिने सुरू होते. यादरम्यान सतत एलपीजी गॅसचा तुटवडा होता. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. ज्यामुळे एलपीजी गॅस मिळत नव्हता.यामुळे एलपीजी गॅस सिंलेडरचे दर सातात्याने दरवाढ होत होती.. .या सततच्या दरवाढीमुळे परिणाम सर्वसामांन्याचे आयुष्यात पडल्याचे पाहायला मिळाले.. याचा सर्वाधिक जास्त फटका हा हॉटेल व्यावसायिकदारांना बसला होता..त्यांना इराण – इस्रायल युध्दाच्या काळात काही दिवसांसाठी एलपीजी सिलिंडर बंदी घातली होती.. सिलिंडरच्या किमतीत झालेली ही कपात दिलासा दायक आहे.. कारण मागील काही महिन्यांपासून फक्त भाव वाढ होत होती. आता कुठेही दिलासा मिळाला

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत जरी बदल केले असले तरी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यांच्या किंमती आहे तशा स्थीर आहे.. त्यामुळे सध्या तरी घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये कोणतेही कपात झाली नाही..

कसे आहेत नवीन दर..?

नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत 2,930 रुपये असेल. ही किंमत आधीच्या 3,113.50 रुपयांच्या तुलनेत कमी असून, यामुळे ग्राहकांना 183.50 रुपयांचा दिलासा मिळाला आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,580.50 होती. जानेवारीत 2026 मध्ये त्यात वाढ होऊन 1,691.50 झाली. सतत सिलेंडरच्या किमतीत वाढ होऊ 3 हजाराच्या आसपास व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती पोहोचल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत