Headlines

American Neighbor Breaks Down in Tears as Indian Family Leaves for India Emotional Video Goes Viral | प्लीज नका जाऊ आम्हाला सोडून! भारतीय कुटुंबाला निरोप देताना अमेरिकन आजी रडल्या, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


Emotional Goodbye Viral Video: अमेरिकेतून भारतात परतणाऱ्या भारतीय कुटुंबाला निरोप देताना त्यांच्या अमेरिकन शेजारणीला अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Indian Family Returning to India
(फोटो सौजन्य – vijay_kokkeragadda/Instagram)
नाती ही अनेकदा जात, धर्म, पंथ यावर आधारित असतात. अपवाद फक्त एकच, तो म्हणजे शेजारी. तुमचा शेजारी कोण असेल, हे बहुतेक वेळा तुमच्या हातात नसतं. अनेकदा वेगळ्या भाषेचे, संस्कृतीचे, धर्माचे लोक तुमच्या शेजारच्या घरात राहतात. पण याच शेजाऱ्यांसोबत कालांतराने प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. कुठलाही वाईट प्रसंग उद्भवला की नातेवाईक येण्याआधी शेजारीच मदतीला धावून येतात. आणि असे सख्खे शेजारी जेव्हा घर सोडून जातात, तेव्हा खरंच वातावरण भावुक होतं. अन् याच गोष्टीची प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक भारतीय कुटुंब घर सोडून जात आहे, त्यामुळे चक्क अमेरिकन आजीबाई ढसाढसा रडत आहेत. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आजींना रडू आवरेना

अमेरिकेत राहणारं एक भारतीय कुटुंब कायमस्वरूपी भारतामध्ये परतत होतं. पण आपला शेजारी आपल्याला सोडून जातोय, हे पाहून अमेरिकन आजीबाईंना रडू आवरलं नाही. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना भावुक होऊन मिठी मारली. निरोप देताना आजी अक्षरशः लहान मुलांसारख्या ढसाढसा रडल्या. हे भारतीय कुटुंब डिट्रॉईट विमानतळाकडे जाण्याच्या तयारीत असताना हा प्रसंग घडला. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. विजय कोक्केरागड्डा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, त्यांच्या एका मित्रानं हा संपूर्ण भावुक प्रसंग गुपचूप आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे जगभरात व्हायरल होत आहे.

नेटकरी सुद्धा झाले भावुक

या प्रकरणातील विशेष गोष्ट म्हणजे, अमेरिकेतील आयुष्य हे फारच खासगी असतं. लोकं एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत, असं म्हटलं जातं. बहुसंख्य भारतीय लोकं तर एकटेपणामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचे अनुभवही सांगतात. पण जर तुमच्यामध्ये नातं निर्माण करण्याची इच्छा असेल, तर वेगवेगळे देश, भाषा आणि संस्कृती असूनही लोकं तुमच्यासोबत जोडले जातात. अन् असाच काहीसा प्रकार या प्रकरणात घडलाय. एकमेकांना निरोप देताना दोन्ही कुटुंबांना रडू आवरत नव्हतं. हा व्हिडीओ vijay_kokkeragadda या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ४७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनाही आपल्या परदेशातील मित्र आणि शेजाऱ्यांच्या आठवणी आल्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा