Latur Ausa Kharosa Village Married Woman has Ended her Life with her Two Children; कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार
Latur Ausa Kharosa Village Married Woman has Ended her Life with her Two Children; कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार
Latur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपल्या दोन मुलांसह आपलं आयुष्य संपवलं आहे.
खरोसा महिलेची दोन मुलांसह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यात एका महिलेनं दोन चिमूरड्यासह आत्महत्या केल्याची मोठी घटना उघड झाली आहे. औसा तालुक्यातील खरोसा गावात रविवारी १९ एप्रिल रोजी रात्री कौटुंबिक वादातून एका कंटाळलेल्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. निकिता अमरदीप भुरे (वय २५) या विवाहितेनं आपल्या दोन मुलांसोबत घेत ग्रामपंचायतीजवळील विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
नेमकी घटना काय?
प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हा या टोकाच्या निर्णयामागील कारण असल्याचं समोर येत आहे. मात्र, नेमकं कारण काय होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नातेवाईक, शेजारी आणि संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून तिन्ही पार्थिव बाहेर काढले. मनोज भरत भुरे यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा तिघा मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. Raigad Crime : आधी लॉजवर नेलं, दरवाजा बंद करुन जीवघेणा हल्ला; रायगडच्या लॉजवर तरुणीचं पार्थिव आढळलं
सकाळपासून दोन्ही मुलांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात शोधमोहीम सुरू असतानाच काही तासांनी धक्कादायक घटना उघडकीस आली. ६ वर्षीय देवांश मंगेश स्वामी हा घरापासून अवघ्या सुमारे ६० फुटांवर मृताअवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा