लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि जल्लोष… पण कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे एका लग्नाने समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. २० मे रोजी संपन्न झालेल्या सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने, पेठकर परिवाराने बहादरपुरा गावातील तब्बल ३,४०० नागरिकांचा प्रत्येकी १ लाख रुपयांचा अपघात विमा उतरवला आहे. या एका विवाह सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण गावाला तब्बल ३३ कोटी ६० रुपयांचे सामूहिक विमा कवच मिळाले आहे.