Headlines

Lakshmi Mittal Steel Plant Missile Attack; भारताचा मित्र रशियाकडून शत्रूसारखी कृत्य! स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचा कारखाना उद्धवस्त, वीज अन् उत्पादनात खंड


Russia Ukraine War : भारतीय अब्जाधीश लक्ष्मी मित्तल यांच्या ArcelorMittal या कंपनीच्या युक्रेनमधील पोलाद कारखान्यावर रशियन क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले आणि 14 कामगार जखमी झाल्याचे रॉयटर्सने अहवालातून सांगितले. रशियाच्या अलीकडच्या या ड्रोन हल्ल्यानंतर वीज निर्मिती आणि भट्ट्यांशी संबंधित महत्त्वाच्या सुविधांचे नुकसान झाले असून कारखान्यातील उत्पादन थांबवावे लागले आहे.

लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला

भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या युक्रेनमधील आर्सेलरमित्तल स्टील प्लांटवर काल रात्री रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांचे मूळ गाव क्रिव्हियेह येथील युक्रेनचा सर्वात मोठ्या पोलिश प्लांटला लक्ष्य करून हल्ला केला गेला. आर्सेलरमित्तल क्रिव्हियेहने टेलिग्रामवरील एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे वीज प्रकल्प आणि ब्लास्ट फर्नेससह प्रमुख उत्पादन सुविधांचे नुकसान झाले आणि प्रकल्पातील उत्पादनाला अंशतः ब्रेक लागला.

Maharashtra TimesGold Silver Rate: सोमवारी बाजारात उघडताच मोठा उलटफेर, सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले; US-इराण तणावाने वाढवली धडधड

रशियाकडून स्टील प्लॅन लक्ष्य

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात दूर पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दोघांनी शेकडो ड्रोनचा वापर करून आघाडीपासून दूर स्थित ऊर्जा, औद्योगिक आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत.

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी Kryvyi Rih येथील एका मेटलर्जिकल प्लांटला, तसेच कीवमधील लष्करी-औद्योगिक सुविधांना लक्ष्य केले असून हल्ल्यांच्या ताज्या लाटेदरम्यान त्यांनी रशियाभर 822 युक्रेनियन ड्रोन रोखल्याचाही दावा केला.

Maharashtra TimesRetirement Planning: रिटायरमेंटसाठी SCSS योजना कितपत योग्य? FD पेक्षा जास्त रिटर्न्स, दरमहा हजारो रुपये मिळतील, पण वेळीच समजून घ्या धोके

युक्रेन युद्धात स्टील प्लॅनचा बळी

युक्रेनच्या प्रमुख औद्योगिक सुविधांपैकी आर्सेलरमित्तल क्रिव्हि रिह ही अब्जाधीश लक्ष्मी मित्तल यांच्या नियंत्रणाखालील आर्सेलरमित्तल या पोलाद कंपनीचा भाग आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणात आक्रमण सुरू केल्यापासून सतत रशियन हल्ल्यांच्या छायेत या प्रदेशातील औद्योगिक उत्पादनावर अलीकडच्या हल्ल्याचा आणखी परिणाम होऊ शकतो. या कारखान्यातून वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या स्थिर पुरवठा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून यामुळे ऊर्जा आणि ब्लास्ट फर्नेस सुविधांचे लक्षणीय नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, रशियाने स्टील प्लांटवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात युक्रेनने रशियाच्या हद्दीतही ड्रोन हल्ले तीव्र केले.रात्रभरात शेकडो युक्रेनियन ड्रोन रोखल्याचा रशियाने दावा केला असून या हल्ल्यात 83 वर्षीय वृद्ध व्यक्ती ठार झाल्याचे मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी सांगितले. युद्धाच्या सुरुवातीपासून या प्रदेशातील युक्रेनच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी असे या हल्ल्याचे वर्णन केले.

पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाल्यापासून रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चेत अडथळा आला असून युद्ध आघाडीवर परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. परिणामी, रशिया आणि युक्रेन एकमेकांवर खोलवर हल्ले करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहेत.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत