Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील स्त्री भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता कुशल बद्रिके सध्या त्याच्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्यानं यापूर्वी ‘ चला हवा येऊ द्या ‘ हा लोकप्रिय कार्यक्रमातूनही अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये कुशलनं स्त्री भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलंय. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेनं स्त्री भूमिकांबद्दल भाष्य केलं आहे. पुरुषप्रधान देशात मला स्त्री भूमिका करून माझं घर चालवता आलं, ही मोठी गोष्ट, असं कुशल म्हणाला आहे.
‘एकदा मी दुबईला गेलेलो. तर, मी वॉशरूमला गेल्यावर ते लोक माझ्याकडे असे बघायला लागले की, मला भीती वाटायला लागली. गंमतीची गोष्ट बाजूला ठेवून मी याकडे गांभीर्यानं बघतो. मला वाटतं की, आपला देश कृषीप्रधान कमी आहे आणि पुरुषप्रधान जास्त आहे. तुमच्या सोसायटीमध्ये एखादी सिंगल मदर असेल, तर तिला असं सांगितलं जातं की, आता या मुलाचा बाप म्हणून तुला जगायचंय. असं पुरूषाला सांगत नाहीत, आता मुलाची आई म्हणून तुला जगायचंय. अशा या पुरुषप्रधान देशात मला स्त्री भूमिका करून माझं घर चालवता आलं, ही मला फार मोठी गोष्ट वाटते.’ असं अभिनेत्यानं पुढे सांगितलं. ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बद्रिके बोलत होता.
दरम्यान, कुशल बद्रिकेच्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर, या सिनेमामध्ये त्याच्यासोबत अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा