Headlines

114 राफेल विमानांसाठी फ्रान्सकडून प्रस्ताव सादर


94 विमानांची निर्मिती भारतात होणारv

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाची स्क्वाड्रन संख्या वाढवण्यासाठी फ्रान्सने भारताला एक मोठा प्रस्ताव सादर केला आहे. फ्रान्सने 114 राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आपला सविस्तर तांत्रिक आणि व्यावसायिक प्रस्ताव सादर केला आहे. 114 राफेल लढाऊ विमानांपैकी 94 विमानांची निर्मिती एका भारतीय औद्योगिक भागीदाराच्या सहकार्याने भारतात करण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे. सूत्रांनुसार, सुमारे 3.25 लाख कोटी रुपयांचा हा करार सध्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभाग आणि भारतीय हवाई दलाच्या विचाराधीन आहे.

फ्रान्सच्या प्रस्तावाचे एक प्रमुख वैशिष्ट्या म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणावर स्थानिक उत्पादन करण्याची योजना आहे. यावर्षी मे महिन्यात भारत सरकारने गव्हर्नमेंट-टू-गव्हर्नमेंट खरेदी मार्गांतर्गत फ्रान्सला एक विनंती पाठवली होती. याला प्रतिसाद म्हणून फ्रान्सने हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, भारतात 94 विमानांची निर्मिती करताना या करारामध्ये फ्रेंच संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी डसॉल्ट एव्हिएशन, तसेच एमबीडीए, सॅफ्रान आणि थेल्स यांसारख्या आघाडीच्या फ्रेंच संरक्षण कंपन्यांचा समावेश असेल. या करारामध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढवणे आणि भारतीय शस्त्रास्त्रांचे एकत्रीकरण करण्यावर भारत सरकार विशेष भर देत आहे. राफेल विमानांना स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र’ हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने आणि इतर स्वदेशी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची भारताची योजना आहे. संरक्षण तज्ञ आणि हवाई दलाचे अधिकारी प्रस्तावातील या तरतुदीचे बारकाईने मूल्यांकन करत आहेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत