Headlines

kapil dev statement on rohit sharma odi retirement rumours ind vs eng ; उलट आपण आनंदी झालं पाहिजे! रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या चर्चांदरम्यान कपिल देव यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष


Team India News : रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार का? हा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात सर्वत्र फिरत आहे. बीसीसीआयने या अफवा फेटाळल्या असल्या तरी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी यावर एक मोठे विधान केले असून फॅन्सना भावुक न होण्याचा सल्ला दिला आहे.

kapil dev statement on rohit sharma odi retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट जगतात सध्या रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या शेवटच्या वनडे मॅचनंतर हिटमॅन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी ‘जोपर्यंत तो योजनांचा भाग असेल, तोपर्यंत खेळत राहील’ या त्यांच्या विधानाने अनेक शक्यता उरल्या आहेत. या सगळ्यात भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी रोहितच्या निवृत्तीवर एक मोठे आणि चकित करणारे विधान केले आहे.

दुखी का व्हायचं? कपिल देव यांचा सवाल

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर बोलताना १९८३ चे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी थेट फॅन्सना प्रश्न केला आहे. एनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, रोहितच्या निवृत्तीने आपण दुखी का व्हायचे? उलट आपण खुश असायला हवे. कारण प्रत्येकाला एक ना एक दिवस क्रिकेटला अलविदा करावाच लागतो. यापूर्वी सुनील गावस्कर गेले, राहुल द्रविड गेला, अनिल कुंबळे गेला आणि खुद्द सचिन तेंडुलकरही गेला. त्यामुळे प्रत्येकाची वेळ ठरलेली असते.

Maharashtra TimesENG vs IND: वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर; लॉर्ड्स वनडेसाठी 23 वर्षीय स्पिनर-ऑलराऊंडरची टीम इंडियात एन्ट्री, नेमका कोण?

रोहितच्या कारकिर्दीचे सेलिब्रेशन करा

कपिल देव यांनी पुढे सांगितले की, चाहत्यांनी रोहितच्या निवृत्तीवर दुखी होण्यापेक्षा त्याने मिळवलेल्या यशाचा आणि महान कारकिर्दीचा उत्सव साजरा केला पाहिजे. रोहितने फक्त भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला आपल्या फलंदाजीने भरभरून आनंद आणि मनोरंजन दिले आहे. त्यामुळे जेव्हा तो क्रिकेटमधून निवृत्त होईल, तेव्हा आपण आनंदाने त्याला निरोप दिला पाहिजे, असे स्पष्ट मत कपिल देव यांनी व्यक्त केले.

Maharashtra TimesIND vs ENG 3rd ODI : रोहित कारकिर्दीचा शेवट शतकाने करेल, सगळ्यांना सडेतोड उत्तर देईल; रिटायरमेंटच्या चर्चांमध्ये कोणी केला दावा?

kapil dev on rohit sharma odi retirement rumours

शेवटच्या सामन्यात शतकाची अपेक्षा

रोहित शर्माला भविष्यासाठी शुभेच्छा देताना कपिल देव यांनी आशा व्यक्त केली की, हिटमॅन जेव्हा कधी मैदानातून बाहेर पडेल, तेव्हा तो अत्यंत दिमाखात आणि शानदार अंदाजात निरोप घेईल. रोहितने त्याच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकूनच निवृत्ती घ्यावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. ३९ वर्षांच्या रोहितने २००७ मध्ये वनडे पदार्पण केले होते. तो आधीच टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तर सध्याच्या इंग्लंड मालिकेतील खराब फॉर्ममुळे त्याच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.